आमच्या आयुष्यात आनंद घेऊन आलीस; नागार्जुन यांची सून शोभितासाठी भावनिक पोस्ट
नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाल यांच्या लग्नाने सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे. 4 डिसेंबर 2024 रोजी यांचे लग्न झाले. या जोडप्याच्या लग्नाची जशी चर्चा झाली तशीच चर्चा आता नागार्जुन यांच्या पोस्टची होताना दिसत आहे. त्यांनी आपल्या सुनेसाठी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलीपालासोबत त्याने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. काल म्हणजे 4 डिसेंबर 2024 रोजी नागा आणि शोभिता लग्नबंधनात अडकले. त्यांचे लग्न ठरल्यापासूनचे प्रत्येक विधी हे एखाद्या सणाप्रमाणे पार पडलेले पाहायला मिळाले. शोभिताचे नागा कुटुंबात मोठ्या थाटामाटात आणि प्रेमात स्वागत झालं.
नागा कुटुंबात सून शोभिताचे थाटात स्वागत
लग्न पार पडल्यानंतर शोभिताचे सासरे आणि अभिनेते नागार्जुन यांनी त्यांच्या मुलाचे आणि सुनेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. एवढच नाही तर त्यांनी आपल्या सुनेसाठी एक भावनिक पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. नागार्जुन यांच्या या पोस्टवरून एक वडिल म्हणून आपल्या मुलाचे घर पुन्हा एकदा उभारताना पाहून त्यांना आनंद झाल्याचे दिसून येते.
Watching Sobhita and Chay begin this beautiful chapter together has been a special and emotional moment for me. 🌸💫 Congratulations to my beloved Chay, and welcome to the family dear Sobhita—you’ve already brought so much happiness into our lives. 💐
This celebration holds… pic.twitter.com/oBy83Q9qNm
— Nagarjuna Akkineni (@iamnagarjuna) December 4, 2024
“आमच्या आयुष्यात आनंद घेऊन आलीस…”
नागार्जुन यांनी नागचैतन्य आणि शोभिता यांच्या लग्नाचे फोटो शेअर करत लिहिलं आहे की, “शोभिता आणि माझा मुलगा नागा चैतन्य यांनी आपल्या नव्या आयुष्याला सुरूवात केली आहे. त्यांचा हा नवीन प्रवास सुरू होताना पाहणं हा क्षण माझ्यासाठी भावनिक होता. चैतन्य तुझं खूप खूप अभिनंदन! प्रिय शोभिता तुझं कुटुंबात मनापासून स्वागत… तू आमच्या आयुष्यात आनंद घेऊन आलीस.” असं म्हणत त्यांनी आपल्या सुनेचं गोड कौतुक करत त्यांच्या भावना व्यक्त करू. दरम्यान नागार्जुन यांची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होतेय.
त्यांनी पुढे एएनआर गुरूंची उल्लेख करत लिहिले की, “हे लग्न आणखी खास बनले आहे कारण त्यांनी त्यांना आशीर्वादही दिला आहे, या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचे प्रेम आणि मार्गदर्शन आमच्यासोबत आहे असे वाटते. आज आपल्यावर झालेल्या असंख्य आशीर्वादांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.’ असं म्हणत नागार्जुन यांनी आनंद व्यक्त करत सर्वांचे आभार मानले आहेत.
नागचैतन्य आणि शोभिता यांचा लग्नातील लूकही बराच व्हायरल होतोय. त्यांनी दाक्षिणात्य पद्धतीचा पेहेराव केला आहे. तसेच काही खास मित्रमंडळी आणि घरच्या मंडळीमध्येच यांचा विवाह संपन्न झाला.