Video : “झुंड”चं सैराट प्रमोशन, नागराज “आण्णां”नी बडवली हलगी, आर्ची, परश्याचा भररस्त्यात झिंगाट डान्स!

नागराज मंजुळेच्या झुंड या चित्रपटाचे प्रमोशनही जोरात सुरू आहे. आज पुण्यातलं प्रमोशन मात्र आजवर झालेल्या सर्व प्रमोशनला फेल करणारं ठरलं. कारण पुण्यात नागराज मंजुळेंनी थेट हलगी हातात धरत, जोरात हलगी बडवली आहे.

Video : झुंडचं सैराट प्रमोशन, नागराज आण्णांनी बडवली हलगी, आर्ची, परश्याचा भररस्त्यात झिंगाट डान्स!
नागराज आण्णांचा भन्नाट अंदाजImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 8:23 PM

पुणे : नागराज पोपटराव मंजुळेंना (Nagraj Manjule) उर्फ आण्णा यांना न ओळखणारा माणूस कलाविश्वात उरला नाही. आधी नागराज आण्णांच्या पिस्तुल्याची हवा झाली. त्यानंतर फॅन्ड्रीची चर्चा आणि पुन्हा सैराटने (Sairat Movie) तर इतिहासच रचला. त्यानंतर नागराज मंजुळे हे नाव प्रत्येक मोठ्या हिरोपर्यंत, प्रत्येक मोठ्या निर्मात्यापर्यंत पोहोचलं. आता नागराज मंजुळेंच्या झुंडचीही (Zund Movie) तेवढीच हवा आहे. नागराज मंजुळेच्या झुंड या चित्रपटाचे प्रमोशनही जोरात सुरू आहे. आज पुण्यातलं प्रमोशन मात्र आजवर झालेल्या सर्व प्रमोशनला फेल करणारं ठरलं. कारण पुण्यात नागराज मंजुळेंनी थेट हलगी हातात धरत, जोरात हलगी बडवली आहे. हेच व्हिडिओ आताा जोरदार व्हायरल होऊ लागले आहेत. नागराज आण्णा ज्यावेळी सैराट होऊन हलगी वाजवत होते. तेव्हा आर्ची आणि परशासह इतर कलाकार भररस्त्यात झिंगाट डान्स करताना दिसून आले.

नागराज आण्णाचं भन्नाट रुप

सैराट या चित्रपटाने सबंध महाराष्ट्राला याड लावणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे या अवतारात बघून चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. मुळचे सोलापूर जिल्ह्यातील असणारे आण्णा आता मुंबईला आले आणि सिनेमांच्या माध्यमातून जगभर पोहोचले तरी त्यांच्या बोलण्याचा लहेजाही बदलला नाही. नागराज आण्णांनी आपलं साधेपण अगदी तसच्या तसं जपून ठेवलंय. तेच साधेपण आणि भन्नाट कल्पकता त्यांच्या वागण्यात आणि सिनेमात दिसून येते.

झुंडचा चांगलाच बोलबाला

अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला ‘झुंड’ हा चित्रपट आजपासून सिनेमागृहांमध्ये दाखल झाला आहे. ‘सैराट’मध्ये परश्याची भूमिका साकारलेला आकाश ठोसर याचीसुद्धा ‘झुंड’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ‘झुंड’मध्ये अमिताभ बच्चन हे एका क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या चित्रपटाची कथा आहे. नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाची स्क्रीप्ट लिहिण्यासाठी जवळपास दोन वर्षांचा वेळ घेतला. बिग बींना नजरेसमोर ठेवूनच त्यांनी ही स्क्रीप्ट लिहिली. नागपूरमध्ये या चित्रपटाचं शूटिंग पार पडलं. सध्या सगळीकडे याच चित्रपटाचा बोलबाला सुरू आहे.

आण्णाचा पहिला बॉलिवूड चित्रपट

‘सैराट’, ‘फँड्री’, ‘नाळ’ यांसारख्या एकापेक्षा एक दमदार चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या नागराज मंजुळेंचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे. नागपुरातील विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाची कथा असून यामध्ये बिग बी बारसेंची भूमिका साकारत आहेत. नागराज आण्णाचा सिनेमा म्हटलं की प्रेक्षकांना ग्राऊंड रिअॅलिटीचं जास्त दर्शन होतं. वास्तविक जीवनावर नागराज आण्णाचे सिनेमे असतात. त्यामुळे ते सर्वांना आपलेसे वाटतात.

Single Movie : अभिनय बेर्डे आणि प्रथमेश परब यांच्या ‘सिंगल’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात

सलमान खान आणि कटरिना कैफचा ‘टायगर 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ तारखेला रिलीज होणार

‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ची पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड, वाचा सविस्तर…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.