अभिनेत्रीच्या आयुष्यात दुःखांचा डोंगर.. 2 घटस्फोट, 3 लग्न… प्रेमासाठी तिने देशही सोडला, पण…

| Updated on: May 17, 2023 | 12:32 PM

सिनेमातील कथेप्रमाणे झालं अभिनेत्रीचं खासगी आयुष्य... दुःख काही केल्या संपतच नव्हते... प्रेमासाठी अभिनेत्रीने देशही सोडला परदेशात गेली, तिसरं लग्न केलं आणि...

अभिनेत्रीच्या आयुष्यात दुःखांचा डोंगर.. 2 घटस्फोट, 3 लग्न... प्रेमासाठी तिने देशही सोडला, पण...
Follow us on

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना मोठ्या पडद्यावर यश मिळालं, पण खासगी आयुष्यात मात्र अभिनेत्रींना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला.. १९८६ साली प्रदर्शित झालेला ‘नसीब अपना अपना’ (Naseeb Apna Apna) सिनेमा तुम्हाला आठवत असेल… अभिनेते ऋषी कपूर आणि अभिनेत्री फराह नाझ स्टारर ‘नसीब अपना अपना’ सिनेमाने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. सिनेमात ऋषी कपूर यांचे दोन लग्न झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. पहिलं लग्न अरेंज मॅरेज तर दुसरं लग्न लव्ह मॅरेज झाल्याचं सिनेमात दाखवण्यात आलं… सिनेमात ऋषी कपूर यांची पहिली पत्नी अशिक्षित आणि कुरुप दाखण्यात आली, तर दुसरी पत्नी उच्च शिक्षित आणि सुंदर दाखवण्यात आली… सिनेमात ऋषी कपूर यांनी किशन सिंग या भूमिकेला न्याय दिला.. आजही सिनेमाची चर्चा तुफान रंगलेली असते..

सिनेमात ऋषी यांच्या पहिल्या पत्नीची भूमिका साकारणीरी राधिका सरथकुमार (Radhika Sarathkumar) हिला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं.. सिनेमात फराह नाझ हिची सवत म्हणून राहिलेल्या राधिका हिच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री फार उशीरा झाली.. अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यात देखील असंच काही झाली आहे. राधिका हिला सिनेविश्वात यश मिळाल पण अभिनेत्रीने खासगी आयुष्यात अनेक चढ – उतार पाहिले.

राधिका हिचं पहिलं लग्न

फिल्मी कुटुंबातील असलेली राधिका अभिनेते राजगोपालन राधाकृष्णन यांची मुलगी आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अभिनेत्रीने लग्न केलं. १९८६ साली राधिका हिने अभिनय क्षेत्रात पाय ठेवला. तर अभिनेत्रीचं लग्न १९८५ साली प्रसिद्ध अभिनेता, लेखर, आणि निर्माता प्रताप पोथेन याच्यासोबत झालं होतं.. पण दोघांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही… अखेर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला…

राधिका हिचं दुसरं लग्न

पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात दुसऱ्या प्रेमाची एन्ट्री झाली.. राधिका ब्रिटीश येथील रिचर्ड हार्डी याच्यासोबत लग्न केलं आणि देश सोडून दुसऱ्या पतीसोबत परदेशात राहू लागली. दोघांनी १९९० साली लग्न केलं. रिचर्ड आणि राधिका यांना एक मुलगी देखील आहे. मुलीचा जन्म झाल्यानंतर दोघांमधील वाद वाढले.. लग्नच्या दोन वर्षांनंतर रिचर्ड आणि राधिका यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला..त्यानंतर राधिका मुलीसोबत भारतात परतली..

राधिका हिचं तिसरं लग्न

रिचर्ड हार्डी यांच्यसोबत घटस्फोट झाल्यानंतर राधिका हिने २००१ साली प्रसिद्ध अभिनेते आणि राजकारणी आर सरथकुमार यांच्यासोबत लग्न केलं. आर सरथकुमार विवाहित आणि दोन मुलांचे वडील असताना त्यांनी राधिका हिच्यासोबत दुसरा विवाह करण्याचा निर्णय घेतला.. आज राधिका आर सरथकुमार यांच्यासोबत खूप आनंदी आहे.