बोल्ड मेकअप आणि स्टनिंग लुक… बॉलिवुडच्या ‘या’ दमदार अभिनेत्याला स्त्री वेशात पाहून भल्या भल्यांची झोप उडाली
या पोस्टेरमध्ये नवाजुद्दीनला ओळखनेही मुश्कील आहे. ग्रे कलरचा ग्लिटरी गाऊन, बोल्ड मेकअप, स्टायलिश हेअरस्टाई असा नवाजुद्दीनचा स्टनिंग लुक पहायला मिळाला आहे. पोस्टरमध्ये स्त्री वेशातील नवाजुद्दीनच्या हातात एक हत्यार असून त्याचे हात रक्ताने माखले आहेत. या मूव्हीमध्ये नवाजुद्दीन एका लेडी डॉनची भमिका साकारणार आहे.
नवी दिल्ली : बॉलीवूडच्या अनेक पुरुष कलाकारांनी स्त्री वेशभूषातील भूमिका साकारल्या आहेत. अगदी ऋषी कपूर पासून ते रितेश देशमुख पर्यंत अनेकांनी साकारलेल्या वेशभूषेतून भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. आता बॉलिवूडमध्ये स्त्री भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत बॉलीवूडच्या आणखी एका दमदार अभिनेत्याचे नाव सामील झाले आहे. तो अभिनेता आहे नवाजुद्दीन सिद्दिकी(Nawazuddin Siddiqui ). बोल्ड मेकअप मध्ये नवाजुद्दीन ला ओळख नाही मुश्किल झाले आहे. त्याच्या आगामी हड्डी(Haddi) या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमध्ये नवाजुद्दीनची स्त्री वेशभूषेतील झलक पहायला मिळाली आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकीचा लेडी डॉन अवतार
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या हड्डी या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करण्यात आले आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचा हा लिड रोल स्त्री वेशात आहे. पोस्टरमध्ये नवाजुद्दीन एका मुलीच्या लूकमध्ये दिसत आहे. या पोस्टेरमध्ये नवाजुद्दीनला ओळखनेही मुश्कील आहे. ग्रे कलरचा ग्लिटरी गाऊन, बोल्ड मेकअप, स्टायलिश हेअरस्टाई असा नवाजुद्दीनचा स्टनिंग लुक पहायला मिळाला आहे. पोस्टरमध्ये स्त्री वेशातील नवाजुद्दीनच्या हातात एक हत्यार असून त्याचे हात रक्ताने माखले आहेत. या मूव्हीमध्ये नवाजुद्दीन एका लेडी डॉनची भमिका साकारणार आहे.
हड्डी चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
हड्डी चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली आहे. सध्या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. पुढील वर्षी 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नवाजुद्दीनच्या लुक व्यतीरीक्त काहीच माहिती समोर आलेली नाही. मात्र, हा एक थ्रीलींग रिव्हेंज असा एक्शन पट असल्याची चर्चा आहे. नवाजुद्दीन व्यतीरीक्त या चित्रपटात आणखी कोण कलाकार असतील हे देखील अद्याप रिव्हील करण्यात आलेले नाही.
Crime has never looked this good before. ? #Haddi, a noir revenge drama starring @nawazuddin_s in a never-seen-before avatar.Filming begins, releasing in 2023.@AkshatAjay @rajesh_rosesh #SaurabhSachdeva #ShreeDharDubey @imadityakashyap @jayoza257 @ravibasrur pic.twitter.com/HJbFk3thcT
— Zee Studios (@ZeeStudios_) August 23, 2022
रितेशने साकारलेली सानियाची भूमिका लक्षवेधी ठरली
बॉलिवूडमधील अनेक कलारांनी स्त्री वेशभुषा साकारली आहे. मात्र, अपना सपना मनी मनी या चित्रपटात अभिनेता रितेश देखमुख याने साकारलेली सानियाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटात रितेश स्त्री पात्रातील गाणं देखील तितकेच लोकप्रिय ठरले.