Happy Birthday Nawazuddin Siddiqui | नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘या’ चित्रपटांनी दिली बड्या कलाकारांना टक्कर, जाणून घ्या या खास चित्रपटांबद्दल

उत्तर प्रदेशातील मुझफ्फर नगर जिल्ह्यातील बुढाना येथे राहणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याला ओळखत नाही, असं कोणीच नाही. जेव्हा अगदीच सरासरी दिसणारा नवाझ चित्रपटामध्ये आपला दमदार शॉट देतो, तेव्हा पाहणाऱ्याच्या नजरा खिळून राहतात.

Happy Birthday Nawazuddin Siddiqui | नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘या’ चित्रपटांनी दिली बड्या कलाकारांना टक्कर, जाणून घ्या या खास चित्रपटांबद्दल
नवाजुद्दीन सिद्दीकी
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 11:24 AM

मुंबई : उत्तर प्रदेशातील मुझफ्फर नगर जिल्ह्यातील बुढाना येथे राहणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याला ओळखत नाही, असं कोणीच नाही. जेव्हा अगदीच सरासरी दिसणारा नवाझ चित्रपटामध्ये आपला दमदार शॉट देतो, तेव्हा पाहणाऱ्याच्या नजरा खिळून राहतात. सर्व बड्या कलाकारांना मागे टाकत नवाज स्वतःच्या मेहनतीवर येथे पोहोचला आहे. कधी मंटो तर, कधी ठाकरे अशी मोठी पात्र देखील नवाजुद्दीनने लीलया सकारात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे (Nawazuddin Siddiqui top 5 best film).

खरं सांगायचं तर नवाजने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना भुरळ पडली आहे आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीला चित्रपटात सहायक भूमिका करायला कधीच कमीपणा वाटला नाही. कदाचित हेच कारण आहे की सहायक भूमिका असणाऱ्या चित्रपटांमध्येही बहुतेकदा तो मुख्य भूमिकेतल्या स्टारच्याही पुढे दिसतो. कधी त्याने सलमानला ‘किक’मध्ये तर, कधी ‘बदलापूर’मध्ये वरुण धवनला मागे टाकले.

गँग्स ऑफ वासेपुर

या चित्रपटात तो मनोज बाजपेयी यांचा मुलगा फैजलच्या भूमिकेत दिसला होता. या मल्टीस्टार सिनेमात नवाज तिग्मांशूसारख्या नामांकित कलाकाराच्या तुलनेत वरचढ ठरला. या चित्रपटात नवाजने खूप दमदार अभिनय सादर केला होता.

किक

सलमान खानच्या चित्रपटात नेहमीच त्याचा जलवा असतो. परंतु, असे कसे होऊ शकते की, नवाज एखाद्या चित्रपटात आहे आणि त्यात त्याने आपली छाप सोडू नये. ‘किक’ या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता आणि त्याने अभिनयाच्या बाबतीत सलमान खानला देखील मागे टाकले होते. सलमानबरोबर तो बजरंगी भाईजानमध्येसुद्धा दिसला होता, जरी त्याने चित्रपटात त्याची छोटी भूमिका होती. पण ती देखील खूप चर्चिली गेली (Nawazuddin Siddiqui top 5 best film).

बदलापूर

फेब्रुवारी 2015मध्ये प्रदर्शित झालेला वरुण धवनच्या बदलापूरला चाहते विसरू शकत नाहीत. या चित्रपटात वरुणचा वेगळा लूक होता. तर त्याचवेळी नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या भूमिकेचे खूप कौतुक केले गेले.

लंचबॉक्स

2013मध्ये इरफान खान स्टारर लंचबॉक्स फिल्म रिलीज झाला तेव्हा या चित्रपटाचे खूप कौतुक झाले. पण या चित्रपटातही नवाजने सर्वांना आपल्याकडे आकर्षित केले होते. या चित्रपटात तो मस्तमौलाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटासाठी नवाज यांना अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आले होते.

मॉम

श्रीदेवीचा शेवटचा चित्रपट ‘मॉम’ चाहते कधीच विसरू शकत नाही. एक सशक्त आई म्हणून दिसलेल्या श्रीदेवी सर्वांनाच आवडल्या. पण या चित्रपटात त्यांच्या व्यतिरिक्त ज्याच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले तो नवाजुद्दीन होता. चित्रपटात नवाज एका जासूसच्या भूमिकेत दिसला होता. विशेष म्हणजे त्यांनी चित्रपटाच्या लूकवरही नवे प्रयोग केले.

(Nawazuddin Siddiqui top 5 best film)

हेही वाचा :

Photo : वयाच्या 16 व्या वर्षापर्यंत बॅडमिंटन, नंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री, वाचा दीपिका पदुकोणचा ‘फिल्मी प्रवास’

Video | बिकिनी अवतारात मंदिरा बेदीचा योगा, चाहत्यांना दिल्या ऑक्सिजन वाढवण्याच्या टिप्स!

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.