Drugs Case | आधी चौकशी, मग अटक, ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून टॉलिवूड अभिनेत्रीवर कारवाई

ड्रग्ज प्रकरणी आता टॉलिवूड कनेक्शनही समोर येत आहे. एनसीबीने एका अभिनेत्रीला रविवारी चौकशी करुन सोडून देण्यात दिलं होतं. मात्र, आज पुन्हा चौकशीला बोलाऊन एनसीबीने तिला अटक केलं आहे.

Drugs Case | आधी चौकशी, मग अटक, ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून टॉलिवूड अभिनेत्रीवर कारवाई
Follow us
| Updated on: Jan 04, 2021 | 7:43 PM

मुंबई : ड्रग्ज प्रकरणी आता टॉलिवूड कनेक्शनही समोर येत आहे. एनसीबीने एका अभिनेत्रीला रविवारी चौकशी करुन सोडून देण्यात दिलं होतं. मात्र, आज पुन्हा चौकशीला बोलाऊन एनसीबीने तिला अटक केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी (2 जानेवारी) मिरारोड येथील एका हॉटेलवर एनसीबीने छापा टाकला. यावेळी तेथे एका टॉलिवूड अभिनेत्रीसह काही जणांना ड्रग्जसह ताब्यात घेतलं होतं. (NCB arrest Tollywood actress in Drugs Case after primary inquiry).

बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनचा एनसीबीकडून खोलवर तपास सुरू असतानाच आता मुंबईच्या या ड्रग्ज रॅकेटचं कनेक्शन टॉलिवूडशी निघालं आहे. एनसीबीने शनिवारी रात्रभर वांद्रे आणि मिरारोड येथील महत्त्वाच्या ठिकाणी छापेमारी केली असता एका टॉलिवूड अभिनेत्रीला ताब्यात घेण्यात आलं. या छापेमारीत सुमारे 10 लाख रुपये किमतीचे ड्रग्जही जप्त करण्यात आले. त्यामुळे ड्रग्ज रॅकेटचं जाळं केवळ बॉलिवूडपुरतंच मर्यादित राहिलं नसून त्याचा पसारा टॉलिवूडपर्यंत गेल्याचं बोललं जातंय.

एनसीबीने वांद्रे आणि मिरारोड येथे छापेमारी केली. मिरारोडमधील क्राऊन बिझनेस हॉटेलमध्ये एनसीबने छापा मारला होता. यावेळी ड्रग सप्लायर सईदसोबत एक टॉलिवूड अभिनेत्री आढळून आली. या अभिनेत्रीबरोबरचा सप्लायर फरार असून अभिनेत्रीला एनसीबीने अटक केली होती. मात्र, चौकशीनंतर तिला रविवारी सोडून देण्यात आलं. मात्र, आज पुन्हा चौकशीला बोलावलं असता चौकशीनंतर या अभिनेत्रीला अटक करण्यात आली.

संबंधित हॉटेल आणि हॉटेलचा संचालक गेल्या काही दिवसांपासून एनसीबीच्या रडारवर होते. एनसीबीला टिप मिळताच त्यांनी ही कारवाई करून अभिनेत्रीला ताब्यात घेतलं. ही अभिनेत्री 1 जानेवारी रोजी या हॉटेलमध्ये उतरली होती. या छाप्यात 10 लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहेत. तसेच फरार सईदचं बॉलिवूड ड्रग्जशी कनेक्शन आहे का? याचा शोध घेण्यात येत आहे.

हॉटेलच संशयाच्या भोवऱ्यात

मिरारोडमधील क्राऊन बिझनेस हॉटेल सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात असून हॉटेल विषयीची अधिक माहिती घेण्यात येत आहे. या हॉटेलमध्ये आतापर्यंत कोणकोण उतरले होते, त्यांची काही ड्रग्जची हिस्ट्री आहे का? याचीही माहिती घेण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

वांद्रे येथे 400 ग्रॅम ड्रग्ज जप्त

वांद्रे येथेही शनिवारी रात्री एनसीबीने छापे मारले असून चांद मोहम्मद शेख नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडे एनसीबीला 400 ग्रॅम ड्रग्ज आढळून आले. चांद मोहम्मद हा मल्टिनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर कामावर होता. मात्र, त्याचा ड्रग्ज तस्करीत सहभाग आढळून आला आहे.

हेही वाचा :

ड्रग्ज केसमध्ये फसलेल्या अर्जुनसोबत कंगनाची पार्टी, चिडलेल्या प्रेक्षकांची चित्रपटावर बहिष्कार घालण्याची धमकी!

Bollywood Drugs Case | ड्रग्स प्रकरणात निर्माता करण जोहरला एनसीबीकडून समन्स

NCB Officer Suspended | आरोपींना सहकार्य, तपासादरम्यान संशयास्पद भूमिका, एनसीबीचे दोन अधिकारी निलंबित

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.