Drugs Case | ड्रग्स प्रकरणात NCB कडून अनेक ठिकाणी छापेमारी, पुन्हा बॉलिवूडमधील दिग्गजांचं अटकसत्र

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) ड्रग्ज प्रकरणात (Drugs Case) रविवारी (8 नोव्हेंबर) मुंबईमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी केली.

Drugs Case | ड्रग्स प्रकरणात NCB कडून अनेक ठिकाणी छापेमारी, पुन्हा बॉलिवूडमधील दिग्गजांचं अटकसत्र
Follow us
| Updated on: Nov 09, 2020 | 1:38 AM

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) ड्रग्ज प्रकरणात (Drugs Case) रविवारी (8 नोव्हेंबर) मुंबईमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी केली. यात ‘वेलकम’ चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियाडवाला (Firoz Nadiadwala) यांच्या घराचाही समावेश होता. एनसीबीला फिरोज यांच्या घरात ड्रग्ज सापडले आहेत. यानंतर त्यांची पत्नी शबाना सईद यांना अटक करण्यात आली (NCB raid on many places of Mumbai in Drugs Connection Film producer Firoz Nadiadwala wife arrested).

रविवारी सकाळी फिरोज यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली. यावेळी एनसीबीने 3 मोबाईलसह ड्रग्ज जप्त केले. यानंतर नाडियाडवाला यांच्या पत्नीच्या अटकेची माहिती समोर आली. NCB च्या या कारवाईत फिरोज नाडियाडवाला यांच्या घरात एकूण 717.1 ग्रॅम गांजा, 74.1 ग्रॅम चरस आणि 95.1 ग्रॅम एमडी अमली पदार्थ सापडला आहे. याची किंमत 3 लाख 66 हजार 610 रुपये आहे. NCB च्या अधिकाऱ्यांनी शबाना सईद यांना त्यांच्या गुलमोहर क्रॉस रोडवरील घरातून घरातून अटक केली.

दरम्यान, दीपिका पदुकोणची माजी मॅनेजर करिश्मा प्रकाशलाही NCB ने 10 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. करिश्मा मागील अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे. दुसरीकडे अभिनेत्री दीपिका पदुकोणने देखील करिश्माला नोकरीवरुन काढलं आहे. एनसीबीने मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर, कोपरखैरनेमध्ये अनेक ड्रग्स पेडलर्सच्या ठिकाणांवर छापेमारी केली. या छापेमारीत 5 ड्रग्ज पेडलर्सला अटक करण्यात आली. यातीलच एका ड्रग्ज पेडलरने चौकशीदरम्यान एनसीबीला फिरोज नाडियाडवाला यांचं नाव सांगितलं होतं.

संबंधित बातम्या:

Drugs Connection | ‘फरार’ करिश्मा एनसीबीसमोर हजर, ड्रग्ज प्रकरणी चौकशीला सुरुवात!

Kshitij Prasad | क्षितीज प्रसादवर कोकेन प्रकरणात नवा गुन्हा

NCB raid on many places of Mumbai in Drugs Connection Film producer Firoz Nadiadwala wife arrested

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.