Video : नेहानं पुन्हा एकदा केली प्रेग्नेंसीची फेक अ‍ॅक्टिंग, सोशल मीडियावर ‘हा’ व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट गायिका नेहा कक्कर सध्या तिच्या लग्नामुळे आणि गाण्यांमुळे चर्चेत आहे.(Neha Kakkar's fake acting of pregnancy, Video on social media)

Video : नेहानं पुन्हा एकदा केली प्रेग्नेंसीची फेक अ‍ॅक्टिंग, सोशल मीडियावर 'हा' व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 5:33 PM

मुंबई : बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट गायिका नेहा कक्कर सध्या तिच्या लग्नामुळे आणि गाण्यांमुळे चर्चेत आहे. अशा परिस्थितीत ती आता हनिमूननंतर पुन्हा कामावर परतली आहे. तिनं इंडियन आयडॉलसोबतच स्वत:च्या गाण्यांचं शूटिंगही सुरू केली आहे. असाच तिचा एक खास व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये नेहा ‘ख्याल रखया कर’ या गाण्याच्या सेटवर पाणीपुरी खात आहे. अलीकडेच नेहा प्रेग्नेंट असल्याची चर्चा होती. मात्र ही चर्चा चुकीची ठरली. ती प्रेग्नेंट नसून गाण्यासाठी फोटो शेअर केला असल्याचं तिनं सांगितलं होतं.

या गाण्याची मोठ्याप्रमाणात चर्चा होत आहे. गाण्याचे काही व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. आता व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये नेहा आणि रोहनप्रीत या दोघांमधील प्रेम दिसतय. हा व्हिडीओ नेहाच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस आला आहे.

नेहाच्या प्रेग्नेंसीची चर्चा झाल्यानंतर तिनं स्वत:‘ख्याल रखया कर हे नवं गाणं 22 डिसेंबरला येत आहे’असं कॅप्शन देत तिनं एक फोटो शेअर केला होता. गाण्याच्या प्रमोशनसाठी नेहानं पुन्हा एकदा चाहत्यांना वेडं केलं आहे. तिनं तिच्या आगामी गाण्याच्या प्रमोशनसाठी प्रेग्नेंसीच्या बातम्यांचा वापर केला आहे. नेहानं तिच्या आणि रोहनच्या लग्नाआधी असाच पब्लिसिटी स्टंट केला होता.’नेहू दा व्याह’ या गाण्यात दोघांचं लग्न दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर दोघं खरच लग्नबंधनात अडकले.

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत या दोघांनी 24 ऑक्टोबरला दिल्लीत लग्न केलं. या लग्नातील प्रत्येक कार्यक्रम संस्मरणीय ठरला. लग्नानंतर नेहाचं तिच्या सासरच्या लोकांनी मोठ्या थाटामाटात स्वागत केलं होतं. नेहाच्या स्वागतासाठी रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं. नेहा आणि रोहनच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंडमध्ये होते. नेहा आणि रोहन यांनी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सांगितलं की हे दोघं ऑगस्ट 2020 मध्ये ‘नेहू दा व्याह’ या गाण्याच्या शूटिंगदरम्यान भेटले. त्यानंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले.

संबंधित बातम्या

Google Search 2020 : हे तर नवलच! 2020मध्ये नेहा कक्करच्या प्रेग्नेंसीबाबत गुगलवर सर्वाधिक सर्च

Fitness Freak : विकी कौशलचा नवा लूक, आगामी चित्रपटासाठी तयारी करत असल्याची चर्चा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.