22 कंपन्यांची मालकीण, 2 घटस्फोट अन् 2 मुलींच्या वडिलांबरोबर लग्न; ‘या’ मराठी अभिनेत्रीचे आयुष्य फारच चर्चेत
मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांतील एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री जी 22 कंपन्यांची मालकीण, 2 घटस्फोट अन् 2 मुलींच्या वडिलांबरोबर तिने लग्न केलं आहे. ही मराठी अभिनेत्री आहे तरी कोण पाहुयात.
अशी एक मराठी अभिनेत्री जी मराठी सोबतच हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांचाही चेहरा बनली. शिवाय टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी सुद्धा ती अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली. ती अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. नुकताच तिने तिचा 40 वा वाढदिवसही साजरा केला आहे.
नेहाचे खरे नाव आहे शुभांगी. नेहा बिग बॉस सीझन 12 ची स्पर्धकही राहिली आहे. नेहाची ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. टीव्ही मालिकांव्यतिरिक्त नेहा पेंडसे चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट आणि प्रायोजकत्वातून पैसे कमवते.
इंडस्ट्रीतील 29 वर्षे सोपी नव्हती
टीव्हीवरील ‘आय कम इन मॅडम’ आणि ‘भाबीजी घर पर हैं!’ साठी नेहाला प्रसिद्धी जास्त मिळाली. बालकलाकार म्हणून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. तिला इंडस्ट्रीत 29 वर्षे झाली आहेत. मात्र, याचा प्रवास सोपा नव्हता. तिच्या नातेवाइकांनी तिला तिच्या या क्षेत्रावरून खूप नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. एवढच नाही तर अनेक वेळा तिला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला.
नेहा पेंडसेने 1995 मध्ये एकता कपूरच्या टीव्ही शो ‘कॅप्टन हाउस’मधून बालकलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यावेळी ती फक्त 10 वर्षांची होती. यानंतर नेहाने ‘हसरतें’ आणि ‘पडोसन’ सारखे टीव्ही शो केले. 1999 मध्ये या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, साऊथमध्येही तिने नाव कमावलं आहे. नेहाने 1999 मध्ये ‘दाग: द फायर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे आणि ती एके काळी दक्षिण चित्रपटांची लोकप्रिय अभिनेत्री होती.
कास्टिंग काउचचाही सामना करावा लागला
एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे नेहाला तिच्या स्ट्रगलींगच्या दिवसात अनेकदा कास्टिंग काउचलाही सामोरे जावे लागले. याबाबत नेहा पेंडसेने एका मुलाखतीत सांगितले होते. नेहाने सांगितले होते की ती इंडस्ट्रीत नवीन होती. तिचे कोणी गॉडफादर नव्हते. तेव्हा तिला अनेकदा विचित्र अनुभव आल्याचेही सांगितले.
कामापेक्षा वैयक्तिक आयुष्याची चर्चा
दरम्यान नेहीची जेवढ्या अभिनयाबद्द किंवा तिच्या कामाची चर्चा नाही झाली तितकी तिच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा झाली आणि आजही होत आहे. नेहाने 2020 मध्ये बिझनेसमन शार्दुल सिंह ब्याससोबत लग्न केले. नेहाशी लग्न करण्यापूर्वी शार्दुलचा दोनदा घटस्फोट झाला आहे. एवढच नाही तर त्याला 2 मुलीही आहेत. नेहा त्याची तिसरी पत्नी असल्याने नेहाला अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. करोडपती बिझनेसमनची तिसरी पत्नी बनल्यावरही तिच्यावर बरीच टीका झाली. मात्र त्यावर नेहाने ट्रोलर्संना सडेतोड उत्तरही दिलं होतं.
दरम्यान नेहा पेंडसे यांचे पती शार्दुल हे व्यवसायाने व्यापारी असून त्यांच्याकडे 22 कंपन्या आहेत. अहवालानुसार, त्याची एकूण संपत्ती 125 मिलियन यूएस डॉलर म्हणजे अब्जो संपत्ती आहे . जर आपण त्याचे रूपांतर केले तर हा आकडा 10,558 कोटी रुपयांपेक्षा जास्त होतो. म्हणजे नेहा पेंडसेच्या पतीची संपत्ती साडेदहा अब्ज रुपयांहून अधिक आहे.