Video | नेहा कक्करच्या घरी होळी पार्टी, रोहनप्रीतसह पूल डान्स सोशल मीडियावर चर्चेत, पाहा व्हिडीओ…

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Nehha Kakkar) या दिवसांत होळीच्या माहोलमध्ये धमाल करण्यात व्यस्त आहे. नेहा, तिचे कुटुंब आणि तिचा पती रोहनप्रीत सिंह, भाऊ टोनी कक्कर यांच्यासह होळीची प्री-पार्टी साजरी करताना दिसत आहेत.

Video | नेहा कक्करच्या घरी होळी पार्टी, रोहनप्रीतसह पूल डान्स सोशल मीडियावर चर्चेत, पाहा व्हिडीओ...
नेहा कक्कर होळी पार्टी
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 1:05 PM

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Nehha Kakkar) या दिवसांत होळीच्या माहोलमध्ये धमाल करण्यात व्यस्त आहे. नेहा, तिचे कुटुंब आणि तिचा पती रोहनप्रीत सिंह, भाऊ टोनी कक्कर यांच्यासह होळीची प्री-पार्टी साजरी करताना दिसत आहेत. यावेळी ती पती रोहनप्रीतबरोबर पूलमध्ये धमाल करताना दिसली. तसेच, सगळे टोनीच्या ‘सूट तेरा टाईट’ या नवीन गाण्यावर ठुमके लगावताना दिसत आहेत. नेहाने तिच्या इन्स्टाग्रामवर याचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो सध्या खूप चर्चेत आला आहे (Nehha Kakkar Holi 2021 party with family).

या व्हिडीओमध्ये ‘नेहूप्रीत’चे प्रेम आणि त्यांची केमिस्ट्री स्पष्ट दिसत आहे. रोहनप्रीतने नेहाला पूलमध्ये उचलून घेतले आहे. त्याचवेळी नेहा टोनीच्या नव्या गाण्याच्या गंमतीदार तालावर नाचताना दिसत आहे. संपूर्ण कुटुंब होळीच्या या प्री-फंक्शनचा जोरदार आनंद लुटत आहे. लहानमुलांपासून तरूणापर्यंत प्रत्येकजण पूलमध्ये धमाल करत आहे. त्यांची ही स्टाईलही चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. चाहत्यांना नेहाचा हा व्हिडीओ प्रचंड आवडतो आहे. चाहते यावर भरभरून कमेंट करत आहेत, आणि व्हिडीओ शेअरही करत आहेत.

पाहा नेहाचा धमाकेदार व्हिडीओ

 (Nehha Kakkar Holi 2021 party with family)

1.9 दशलक्ष लोकांनी पाहिला हा व्हिडीओ

नेहाचा हा होळीचा व्हिडीओ खूप वेगवान व्हायरल होत आहे. तिने हा व्हिडीओ केवळ 4 तासांपूर्वी पोस्ट केला होता, परंतु आतापर्यंत तो सुमारे 1.9 दशलक्ष लोक पाहिला आहे, तर हजारो लोकांनी तिचा हा व्हिडीओ आवडला आहे. बरेच वापरकर्ते या व्हिडीओवर हार्ट इमोजी कमेंट करत आहेत. नेहाचा भाऊ टोनी कक्कर याचे नवीन गाणे ‘सूट तेरा टाईट’ देखील लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. तर, त्यावर बऱ्याच रील्स देखील बनवल्या जात आहेत.

नेहाचे मजेदार कॅप्शन!

हा डान्स व्हिडीओ शेअर करताना नेहा कक्कर हिने एक मजेशीर कॅप्शनही दिले आहे. ‘Maaroon Pichkari Hoke Left, Hoke Right!!! Pre #Holi fun with Family at homeeee..’, असे कॅप्शन नेहाने दिले आहे. या वेळेची होळी नेहासाठी खूप खास आहे. कारण लग्नानंतरची तिची ही पहिलीच होळी असणार आहे. म्हणून ती खूप उत्साही आणि आनंदी आहे. नेहा तिची पहिली होळी ऋषिकेशमधील गंगानगर येथील राहत्या घरी साजरी करणार आहे. कुटुंबातील सर्व सदस्य यात उपस्थित असणार आहेत.

(Nehha Kakkar Holi 2021 party with family)

हेही वाचा :

आमीर खानचा आदर्श घेत ‘या’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा सोशल मीडियाला ‘गुडबाय’!

Dia Mirza | लग्नानंतर दिया मिर्झाचा बोल्ड अंदाज, सोशल मीडियावर शेअर केले ‘बिकिनी’ फोटो!

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.