शेजारी वेडी म्हणायचे, आईही सोडून गेली, ‘बिग बॉस OTT 3’ च्या स्पर्धकाची थरारक कहाणी
'बिग बॉस OTT 3' मध्ये एक स्पर्धक आहे. ती मूळची उत्तर प्रदेशमधील ओरैया येथील निवासी आहे. अभिनेता राजपालची मुलगीही तिची मोठी फॅन आहे. तिचे शेजारी तिला वेडी म्हणायचे पण याच मुलीने बिग बॉस OTT 3 मध्ये प्रवेश करून शेजाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे.
21 जूनपासून ‘बिग बॉस OTT 3’ ला धमाकेदारपणे सुरवात होत आहे. बिग बॉसच्या घरात एकूण 16 स्पर्धकांनी प्रवेश केला आहे. या सर्व स्पर्धकांची नावे समोर आली असली तरी त्याची अधिकृत घोषणा अजूनही झालेली नाही. दरवेळेप्रमाणे बिग बॉस OTT 3 मध्येही सोशल मीडियाचे स्टार आणि YouTubers चा दबदबा आहे. अभिनय क्षेत्रातील केवळ तीन ते चार नावांचा समावेश बिग बॉस मध्ये करण्यात आला आहे. याच स्पर्धकांमध्ये एक नाव आहे ते म्हणजे शिवानी कुमारी. जिच्याबद्दल जाणून घ्यायची सर्वाना उत्सुकता आहे. तिच्या नावामुळे एकच खळबळ माजली आहे. कोण आहे ही शिवानी कुमारी?
बिग बॉस ओटीटी 3 चे सूत्रसंचालन अभिनेता अनिल कपूर करणार आहेत. अनिल कपूर त्यांच्या झक्कास स्टाईलमध्ये हा शो त्याच्या शैलीत पुढे नेईल. दिलखेचक असा शो होणार आहे. त्यातच स्पर्धक शिवानी कुमारी हिनेही या शोची उत्सुकता वाढविली आहे. निर्मात्यांनी तिचे वर्णन देसी गर्ल असे केलंय.
बिग बॉसच्या निर्मात्यांनी शिवानी कुमारीचा प्रोमो रिलीज केला आहे, ज्यामध्ये ती गुलाबी रंगाच्या सूट सलवारमध्ये दिसत आहे. तुम्ही शहरातील मुली खूप पाहिल्या असतील. परंतु, आता गावातील देसी मुली पाहण्याची वेळ आली आहे असे ती या प्रोमोत म्हणत आहे. कोणी तरी म्हटलं की मी मुलगी आहे. ती काय करू शकते. त्यावर मी म्हणते, हॅलो, माझा कॅमेरा धरा, मी ‘बिग बॉस’च्या घरात सर्वांचे मनोरंजन करणार आहे.
कोण आहे शिवानी कुमारी?
शिवानी कुमारी ही उत्तर प्रदेशातील ओरैया जिल्ह्यातील अरायारी गावातील रहिवासी आहे. सोशल मीडियावर तिच्या पोस्ट खूपच व्हायरल होत असतात. गावात राहून ती फनी रील्स बनवते. ज्यात कॉमेडी देखील असते. इंस्टाग्रामवर तिचे 4 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिचे YouTube चॅनेल देखील आहे. ज्याचे 2.24 दशलक्ष सदस्य आहेत. तिच्या प्रत्येक व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळत असतात. शिवानी कुमारी स्वबळावर प्रसिद्धी मिळवून ‘बिग बॉस’मध्ये पोहोचली आहे.
लोक वेडी म्हणून टोमणे मारायचे
शिवानी बिग बॉसमध्ये पोहोचली असली तरी एक वेळ अशी होती की तिच्याकडे चप्पल घेण्यासाठीही पैसे नव्हते. तिच्या करिअरची सुरुवात तिने TikTok वरील व्हिडिओद्वारे केली होती. शिवानी कुमारीने व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तेव्हा शेजारी तिला टोमणे मारायचे. तिला वेडी म्हणायचे. तिच्या या वेडामुळे तिची आईही तिला सोडून गेली. आता तीच शिवानी सोशल मीडियाच्या दुनियेत खूप नाव कमावत आहे. तिच्या आईला आता तिचा अभिमान वाटतो. सुप्रसिद्ध अभिनेता राजपाल यादवची मुलगी शिवानी कुमारीची मोठी चाहती आहे. ती शिवानीला भेटायलाही आली होती. काही काळी आर्थिक संकटाचा सामना करावा लागलेली शिवानी आज रील्स आणि यूट्यूब चॅनलवरून लाखो रुपये कमवत आहे.