Aishwarya Rai – Abhishek Bachchan खरोखरच घटस्फोट घेणार?, त्या गोष्टीमुळे चर्चांना उधाण; काल असं काय घडलं?

ऐश्वर्या राय बच्चनच्या 51 व्या वाढदिवशी कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे बच्चन कुटुंबातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिषेक आणि अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा न दिल्याने घटस्फोटाच्या अफवांना बळ मिळाले आहे. ऐश्वर्याचे चित्रपटांपासूनचे अंतर आणि कुटुंबातील दुरावा, याची बरीच चर्चा आहे.

Aishwarya Rai - Abhishek Bachchan खरोखरच घटस्फोट घेणार?, त्या गोष्टीमुळे चर्चांना उधाण; काल असं काय घडलं?
Aishwarya Rai and Abhishek Bachchan (1)Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 02, 2024 | 12:48 PM

बॉलिवूडमध्ये बच्चन कुटुंबाचा बराच बोलबाला आहे. मात्र सध्या ही फॅमिली त्यांच्यातील वादामुळे चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिचा पती , अभिनेता अभिषेक बच्चन यांच्यात काहीही आलबेल सून ते दोघ घटस्फोट घेणार असल्याचेही वृत्त आहे . काही महिन्यांपूर्वी अनंत -राधिकाच्या लग्नात अभिषेकने संपूर्ण बच्चन कुटुंबासह एंट्री घेतली, मात्र त्यांच्यासोबत ऐश्वर्या – आराध्या कुठेच दिसल्या नाहीत. बऱ्याच वेळाने त्या दोघींनी वेगळी एंट्री केली, तेव्हा तर त्यांच्यातील वादाच्या चर्चांना आणखीनच उधाण आले. काही रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या सध्या बच्चन कुटुंबासोबत न राहता मुलगी आराध्या आणि तिची आई अशा तिघी राहतात. केबीसीमध्ये अमिताभ बच्चन यांच्या वाढदविसाच्या सोहळ्यामध्ये ऐश्वर्याचा उल्लेख नव्हता, तसेच काही वेळा चाहत्यांशी बोलताना अमिताभ हे घरच्यांबद्दल सांगतात मात्र तेव्हाही ते आराध्या किंवा ऐश्वर्या कोणाचंच नाव घेताना दिसत नाहीत.

या सगळ्यावरून एकंदरच बच्चन कुटुंबातील तणाव सर्वांना दिसत असून काल तर त्यावर एका प्रकारे शिक्कामोर्तबच झालं. सध्या सर्वजण सोशल मीडियावर पोस्ट करतात, वाढदिवसाच्या शुभेच्छाही तिथे दिल्या जातात. काल ( 1 नोव्हेंबर) ऐश्वर्या राय हिचा 51 वा वाढदिवस होता. लाखो चाहते, तसेच सेलिब्रिटींनीही तिला शुभेच्छा दिल्या.पण ऐश्वर्याचा पती अभिषेक, सासरे अणिताभ किंवा बच्चन कुटुंबातील इतर कोणीच तिला विश केलं नाही, ना सोशल मीडियावर पोस्ट टाकली. त्यामुळेच आता ऐश्वर्याच्या चाहत्यांनी अटकळ बांधायला सुरूवात केली असून अभिषेक-ऐश्वर्याच्या नात्यातील तणावाबद्दल उघडउघड चर्चा होत आहे.

हे सुद्धा वाचा

अफवा खऱ्या ठरणार का ?

अभिषेक आणि अमिताभ बच्चन हे काही खूप खाजगी आहेत, सोशल मीडिया वापरत नाहीत असं तर नाहीये. दोघेही सोशल मीडियावर बरेच ॲक्टिव्ह असतात आणि त्यांच्या अकाउंटवर वेळोवेळी त्यांच्या आयुष्याशी आणि चित्रपटांशी संबंधित गोष्टी शेअर करत असतात. यापूर्वी त्यांनी दरवेळेस ऐश्वर्याला तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. पण यावेळेस प्रकरण वेगळंच आहे. यावेळी मात्र अभिषेक आणि अमिताभ यांनी ऐश्वर्याला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत.

ऐश्वर्याचंही तसंच काहीसं आहे. दरवेळेस अभिषेकचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ती सोशल मीडियावर त्याला सपोर्ट करायची. पण सध्या चित्र बदललं आहे. ‘आय वाँट टू टॉक’ या आगामी चित्रपटात अभिषेक दिसणार आहे, पण ऐश्वर्याने त्याच्या सपोर्टसाठी कोणतीही पोस्ट केलेली नाही. पण अभिषेकची बहीण श्वेता नंदा ही मात्र त्याला सपोर्ट करताना दिसली.

गेल्या वर्षी उशीरा केलं होतं विश

तसं पहायला गेलं तर , गेल्या वर्षी देखील अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा खूप उशीरा दिल्या होत्या. त्याने ऐश्वर्याचा फोटो टाकला आणि खाली लिहिले – वाढदिवसाच्या शुभेच्छा. या मेसेजमध्ये त्यांचे पत्नीवरचे नितांत प्रेम कुठेही दिसत नव्हते. पण यावेळेस तर एक पोस्टही नाही, अभिषेकने ऐश्वर्याला शुभेच्छाच दिल्या नाहीत.

चित्रपटांपासून दूर ऐश्वर्या

सध्या ऐश्वर्या रायही चित्रपटांपासून दूर आहे. यावर्षी तिचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. ती शेवटची तामिळ चित्रपट ‘पोनियिन सेल्वन’मध्ये दिसली होती. वेळोवेळी ती सोशल इव्हेंट्समध्ये फक्त ती मुलगी आराध्यासोबत दिसते.

ऐश्वर्याने केल होतं सासऱ्यांना विश

या वादाची बरीच चर्चा असली तरी ऐश्वर्याने तिचं सुनेचं कर्तव्य चोखपणे पार पाडल्याचं वेळोवेळी दिसलं. 11 ऑक्टोबरला अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस असतो, त्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐश्वर्याने त्यांना सोशल मीडियावरून विश केलं. तिने अमिताभ आणि आराध्या यांचा एक गोड फोटो पोस्ट करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. कौन बनेगा करोडपतीमधील व्हिडीओत बच्चन कुटुंबियांनीही अमिताभ यांना शुभेच्छा दिल्या. मात्र त्यात ऐश्वर्या कुठेच दिसली नव्हती.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.