प्रभू रामाचा अवमान.. जितेंद्र आव्हाडांनी संदर्भ दिलेला तो चित्रपट नेटफ्लिक्सने हटवला, निर्मात्यांचाही माफीनामा

'अन्नपूर्णी' या तमिळ चित्रपटामध्ये नयनतारा, जय आणि सत्यराज यांच्या मुख्य भूमिका आहेत. मात्र नयनताराचा हा चित्रपट नुकताच वादात सापडला होता. या चित्रपटावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. त्यावरून बराच वाद सुरू होता. आता चित्रपटाच्या निर्मात्यांनीही भावना दुखावल्याबद्दल माफी मागितली आहे.

प्रभू रामाचा अवमान.. जितेंद्र आव्हाडांनी संदर्भ दिलेला तो चित्रपट नेटफ्लिक्सने हटवला, निर्मात्यांचाही माफीनामा
Follow us
| Updated on: Jan 12, 2024 | 11:09 AM

मुंबई | 12 जानेवारी 2024 : अभिनेत्री नयनताराची मुख्य भूमिका असलेल्या ‘अन्नपूर्णी’ या चित्रपटावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. त्यावरून बराच वाद सुरू होता. शिवसेना नेते रमेश सोलंकी यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल केली . अखेर आता नेटफ्लिकस हा चित्रपट ओटीटीवरून हटवला आहे. तसेच प्रोड्यूसर्सनीही माफी मागितली आहे.

1 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झालेला हा पिक्चर 29 डिसेंबकला नेटफ्लिक्सवर आला होता. मात्र या चित्रपटावर हिंदूच्या भावना दुखावल्याचा तसेच चित्रपटात प्रभू श्रीराम यांचा अपमान करण्यात आल्याचाही आरोपही करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटामुळे बराच वाद सुरू होता. विश्व हिंदू परिषजदेच्या कार्यकर्त्यांनी तर या चित्रपटावर बॅन करण्याची मागणी करत मुंबीतील नेटफ्लिक्सच्या ऑफीसबाहेर निदर्शनेही केली. अखेर नेटफ्लिकसने हा चित्रपट त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनीही दिला होता चित्रपटाचा संदर्भ

या चित्रपटावरून वाद सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळेही नवा वाद सुरू झाला होता. राम हे शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते. त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला होता मग ते शाकाहारी कसे असू शकतात?, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं. त्यावर सत्ताधारी आक्रमक झाले आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आंदोलन सुरु झाले. त्यानंतर जितेंद्र यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या वक्तव्याबाबतचे दाखले दिले.

यावेळी त्यांनी नयनताराच्या या ‘अन्नपूर्णानी’ चित्रपटाचा संदर्भ दिला. “खरं तर मला त्या सिनेमाबद्दल बोलायचे नाही आहे. पण एक उदाहरण म्हणुन सांगतो. अन्नपूर्णानी नावाचा चित्रपट आलाय दक्षिणेतील सुपरस्टार त्या चित्रपटात आहेत. ज्यात त्यांनी वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातला एक श्लोक सांगितला आहे आणि त्याचा अर्थही सांगितला आहे.” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.

चित्रपटातील कोणत्या सीन्सवर आक्षेप?

  • बिर्याणी बनवण्याआधी मंदिराच्या पुजाऱ्यांची मुलगी हिजाब घालून नमाज पठण करते.
  • अभिनेत्रीचा मित्र फरहान तिचं ब्रेनवॉश करून तिच्याकडून मांस कापून घेतो. प्रभू श्रीराम आणि माता सीता हे सुद्धा मांसाहारी होते, असं तो तिला सांगतो.
  • चित्रपटात अभिनेत्री मंदिरात न जाता फरहानच्या घरी रमजान इफ्तार करण्यासाठी जाते. तिचे वडील मंदिरात संध्या आरती करत असतात, आजी माळ जपत असते तेव्हाच अभिनेत्रीचं मांस खातानाचं आणि खाऊ घालतानाचं दृश्य दाखवलंय.
  • अभिनेत्रीचे वडील एका मंदिराचे प्रधान पुजारी असतात. त्यांच्या सात पिढ्या विष्णू देवासाठी नैवेद्य बनवत असतात. मात्र त्यांची मुलगी मांसाहार बनवताना आणि खाताना दाखवलंय.
  • चित्रपटात फरहान नावाच्या एका कलाकाराने म्हटलंय की प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, शिव आणि मुरूगन यांनीसुद्धा मांसाहार केला आहे.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.