मुंबई | 12 जानेवारी 2024 : अभिनेत्री नयनताराची मुख्य भूमिका असलेल्या ‘अन्नपूर्णी’ या चित्रपटावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. त्यावरून बराच वाद सुरू होता. शिवसेना नेते रमेश सोलंकी यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल केली . अखेर आता नेटफ्लिकस हा चित्रपट ओटीटीवरून हटवला आहे. तसेच प्रोड्यूसर्सनीही माफी मागितली आहे.
1 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झालेला हा पिक्चर 29 डिसेंबकला नेटफ्लिक्सवर आला होता. मात्र या चित्रपटावर हिंदूच्या भावना दुखावल्याचा तसेच चित्रपटात प्रभू श्रीराम यांचा अपमान करण्यात आल्याचाही आरोपही करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटामुळे बराच वाद सुरू होता. विश्व हिंदू परिषजदेच्या कार्यकर्त्यांनी तर या चित्रपटावर बॅन करण्याची मागणी करत मुंबीतील नेटफ्लिक्सच्या ऑफीसबाहेर निदर्शनेही केली. अखेर नेटफ्लिकसने हा चित्रपट त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनीही दिला होता चित्रपटाचा संदर्भ
या चित्रपटावरून वाद सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळेही नवा वाद सुरू झाला होता. राम हे शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते. त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला होता मग ते शाकाहारी कसे असू शकतात?, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं. त्यावर सत्ताधारी आक्रमक झाले आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आंदोलन सुरु झाले. त्यानंतर जितेंद्र यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या वक्तव्याबाबतचे दाखले दिले.
यावेळी त्यांनी नयनताराच्या या ‘अन्नपूर्णानी’ चित्रपटाचा संदर्भ दिला. “खरं तर मला त्या सिनेमाबद्दल बोलायचे नाही आहे. पण एक उदाहरण म्हणुन सांगतो. अन्नपूर्णानी नावाचा चित्रपट आलाय दक्षिणेतील सुपरस्टार त्या चित्रपटात आहेत. ज्यात त्यांनी वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातला एक श्लोक सांगितला आहे आणि त्याचा अर्थही सांगितला आहे.” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.