फिर एक दिन अपुन के मोहल्ले में ऐश्वर्या आयी… राहुल महाजन याला नेटकरी असं का म्हणाले ?

राहूल का स्वयंवर असो किंवा बिग बॉस... राहूल महाजन याची चर्चा तर नेहमीच असते. त्याच्या खासगी आयुष्याबद्दल लोक चवीचवीने चर्चा करत असतात. इन्स्टाग्राम अकाऊंटवर राहुलने एका महिलेसोबत फोटो पोस्ट केला आणि पुन्हा चर्चा सुरू झाली.

फिर एक दिन अपुन के मोहल्ले में ऐश्वर्या आयी... राहुल महाजन याला नेटकरी असं का म्हणाले ?
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 30, 2023 | 3:31 PM

मुंबई | 30 नोव्हेंबर 2023 : राहूल का स्वयंवर असो किंवा बिग बॉस… राहूल महाजन याची चर्चा तर नेहमीच असते. ‘बिग बॉस 2’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यानंतर त्याने सर्वांचंच लक्ष वेधलं होतं. त्यानंतर स्वयंवरमुळे राहुलचं खासगी आयुष्य चर्चेत आलं होतं. त्याच्या खासगी आयुष्याबद्दल लोक चवीचवीने चर्चा करत असतात. राहुलही त्याच्या आयुष्याबद्दल मोकळेपणाने व्यक्त होत असतो. सोशल मीडियावरही तो बराच ॲक्टिव्ह असतो.

काही दिवसांपूर्वी तिसऱ्या पत्नीसोबत झालेल्या घटस्फोटाच्या वृत्तामुळे राहुलचं खासगी आयुष्य बरंच चर्चेत आलं होतं. राहुलने तिसरी पत्नी नतालिया इलिनाला घटस्फोट दिल्यानंतर सोशल मीडियावर बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या. मात्र त्यावर राहूलने फारशी प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता हाच राहूल महाजन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तिसऱ्या घटस्फोटानंतर राहुल आता चौथ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याच्याही चर्चांना उधाण आलं. राहुलने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका महिलेसोबत फोटो पोस्ट केला. आणि त्या फोटोमुळेच त्याच्या लग्नाविषयीची चर्चा सुरू झाली आहे.

फोटोवर नेटकऱ्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस

राहुलने इन्स्टाग्रामवर जिच्यासोबत फोटो शेअर केला त्या महिलेचं नाव आहे अनास्तासिया खिजन्याक. दोन दिवसांपूर्वी राहुलने हा फोटो शेअर केला आणि ‘अनास्तासिया सोबतच्या काही आठवणी’अशी कॅप्शनही त्याने लिहीली होती. त्याचा हा फोटो पोस्ट होतो ना होतो तोच त्यावर कमेंट्सचा पाऊस पडू लागला. अनेकांनी त्याच्या फोटोचे कौतुक केले. पण बऱ्याच जणांनी त्याच्या लग्नाबद्दलचं चर्चा सुरू केली. राहुल महान चौथ्यांदा बोहल्यावर चढणार वाटतं. चौथ्यांदा लग्नासाठी तयार आहेस वाटतं ? अशी कमेंट एका युजरने केली. तर एका युझरने अगदी बारीक निरीक्षण करत, फोटोत ‘मागे नेमप्लेटवरही फोर सीझन लिहीलयं’ अशी सूचक कमेंट केली.

एका युजरने तर भन्नाटच कमेंट केली. मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील संजय दत्तच्या एका गाण्यातील वाक्याचा संदर्भ त्याने दिला. ‘फिर क्या हुआ ? फिर… फिर एक दिन अपुन के मोहल्ले में ऐश्वर्या आयी… ‘ अशी कमेंटच त्याने केली. मात्र या सर्व कमेंट्सवर राहूलने काहीही प्रतिक्रिया दिलेली नसून त्याने मौन राहणच पसंत केलं.

तीन लग्नं तीनदा घटस्फोट

2006 मध्ये राहुलने श्वेता सिंहशी लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या दोन वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर राहूल का स्वयंवर रिॲलिटी शो मधून त्याने डिंपी गांगुलीशी लग्न केलं होतं. पण त्या दोघांचं लग्न फक्त पाच वर्ष (2010-2015) टिकलं. त्यानंतर राहुल तिसऱ्यांदा, 2018 साली नताल्या हिच्याशी लग्न केलं. मात्र त्यांचा हा संसारही फार काळ टिकला नाही. काही महिन्यांपूर्वी ते दोघेही वेगळे झाले.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...