‘कपिल शर्माच्या शो’मधून सिद्धू आऊट?
मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानची बाजू घेणे माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे विद्यमान नेते नवजोत सिंह सिद्धू यांच्या चांगलच अंगलट आलं आहे. ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाचा अविभाज्य भाग असलेल्या नवजोत सिंह सिद्धू यांची कार्यक्रमातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. सोनी चॅनेलने त्यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचंही बाोललं जात आहे. तर त्यांच्या जागी अभिनेत्री अर्चना पुरणसिंह या […]
मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानची बाजू घेणे माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे विद्यमान नेते नवजोत सिंह सिद्धू यांच्या चांगलच अंगलट आलं आहे. ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाचा अविभाज्य भाग असलेल्या नवजोत सिंह सिद्धू यांची कार्यक्रमातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. सोनी चॅनेलने त्यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचंही बाोललं जात आहे. तर त्यांच्या जागी अभिनेत्री अर्चना पुरणसिंह या कार्यक्रमात दिसण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाच्या दोन भागांचं शूटिंग अर्चना यांनी केलं. मात्र, सोनी चॅनेलने अद्याप अर्चना यांना सिद्धूच्या जागी रिप्लेस करण्यात आल्याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला केला. यामध्ये आपले 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घेतली. यानंतर संपूर्ण जगातून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. पाकिस्तानविरोधात देशात संतापाची लाट उसळली.
वाचा : “आणखी एका मुलाला सैन्यात पाठवेन, पण पाकला धडा शिकवा”
मात्र, नवजोत सिंह सिद्धू यांना पाकिस्तानचा पुळका आला.
“काही लोकांमुळे संपूर्ण देशाला गुन्हेगार समजणे चुकीचे आहे. हा एक भ्याड हल्ला होता, मी याचा विरोध करतो. हिंसा ही निंदनीय आहे. ज्यांची चुक आहे त्यांना शिक्षा व्हायलाच हवी”, असे म्हणत सिद्धू हे पाकिस्तानची बाजू घेताना दिसले.
सिद्धू यांच्या या वक्तव्यानंतर लोकांमधील आक्रोश वाढला. अनेकांनी त्यांच्या या वक्तव्यावर आणि पाकिस्तानची बाजू घेण्यावर टीका केली. त्यांना तात्काळ ‘द कपिल शर्मा शो’मधून काढण्यात यावे ही मागणी उठू लागली. इतकेच नाही तर, ‘द कपिल शर्मा शो’ बंद करण्यात यावा अशीही मागणी होऊ लागली. त्यानंतर या कार्यक्रमाच्या आयोजकांवरील दबाव वाढला आहे, त्यामुळे सिद्धू यांना कार्यक्रमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येऊ शकतो.
पुलवामा हल्ला :
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे गुरुवारी 14 फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. आदिल अहमद डार नावाच्या दहशतवाद्याने सुसाईट बॉम्बर बनून हा आत्मघाती हल्ला केला.
संबंधित बातम्या :
Pulwama Attack : मास्टरमाईंड आदिल अहमद दार नेमका कोण?
Pulwama Attack: जावेद अख्तर आणि शबाना आझमींवर कंगणांचं टीकास्त्र
गंभीरचा संताप, सेहवागची हळहळ, सलमान,आमीर, शाहरुखची श्रद्धांजली