Sye Raa Narasimha Reddy Teaser: चिरंजीवीचा नवा सिनेमा बाहुबलीला टक्कर देणार!
दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीच्या (Chiranjeevi) आगामी चित्रपट 'सई रा नरसिम्हा रेड्डी'चा टीझर (Sye Raa Narasimha Reddy Teaser) रिलीज झाला आहे. यात 63 वर्षीय चिरंजीवींचा आक्रमक अॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे.
मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीच्या (Chiranjeevi) आगामी चित्रपट ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’चा टीझर (Sye Raa Narasimha Reddy Teaser) रिलीज झाला आहे. यात 63 वर्षीय चिरंजीवींचा आक्रमक अॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. तो इतका प्रभावी आहे की अनेकजण अभिनेता प्रभासच्या ‘बाहुबली’, ‘बाहुबली 2’ आणि ‘साहो’शी त्याची तुलना करत आहेत.
या टीझरची सुरुवात भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील स्वातंत्र्यसैनिकांच्या काही नावांचा उल्लेख करुन होते. त्यानंतर व्हॉईस ओव्हरच्या माध्यमातून नरसिम्हा रेड्डी यांच्याविषयी माहिती दिली जाते. तसेच त्यांचे नाव खूप लोकांना माहिती असल्याचे सांगितले जाते. नरसिम्हा रेड्डी यांच्या मुख्य भूमिकेत चिरंजीवी आहेत. टीझरमधील चिरंजीवीची प्रत्येक अॅक्शन, एक्स्प्रेशन आणि डायलॉग प्रेक्षकांना चांगलाच प्रभावित करतो. संपूर्ण टीझरमध्ये पुढे काय होणार याची उत्सुकता टिकून राहते. यातील ग्राफिक्स इफेक्ट्स अगदी खरे वाटतात. या चित्रपटातील युद्धाचं दृष्य तर अगदी ‘बाहुबली’ची आठवण करुन देतो.
या टीझरला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. ट्विटरवर या चित्रपटाचे 3 हॅशटॅग टॉप 5 मध्ये होते. चिरंजीवीने मोठ्या काळानंतर चित्रपटात एन्ट्री केली आहे. त्यामुळे त्याला पाहायला चाहते आतूर आहेत. याचाच प्रत्यय हे टीझर प्रदर्शित झाल्यानंतर आला.
‘सई रा नरसिम्हा रेड्डी’ एक चरित्रपट आहे. सुरेंद्र रेड्डी यांनी याचे दिग्दर्शन केले असून राम चरण त्याचे निर्माते आहेत. हा चित्रपट उय्यलावडा नरसिम्हा रेड्डी या स्वतंत्र्य सैनिकाच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे. चित्रपटात चिरंजीवीसह सुदीप, विजय सेतुपति, जगपति बाबू, नयनतारा, तमन्ना भाटिया आणि अनुष्का शेट्टी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. बिग बी अमिताभ बच्चन हेही यात पाहुणे कलाकार म्हणून दिसणार आहेत. 2 ऑक्टोबर 2019 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.