Marathi Movie : शिवाजी महाराजांना समर्पित ‘हरिओम’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

रयतेचा राजा म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत. (New Movie On Chhatrapati Shivaji Maharaj)

Marathi Movie : शिवाजी महाराजांना समर्पित 'हरिओम' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 6:24 PM

मुंबई : रयतेचा राजा म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत. केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात शिवाजी महाराजांचं नाव आदरानं घेतलं जातं. अनेक विद्वान, तत्त्वज्ञ, इतिहासकार शिवाजी महाराजांवर अभ्यास करण्यासाठी भारतात येतात. शिवाजी महाराजांवर, त्यांच्या पराक्रमांवर चित्रपटांतून देखील अनेकदा प्रकाश टाकला गेला आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘हरीओम’ हा सिनेमा येत आहे. या सिनेमाचे पहिले टिझर पोस्टर या चित्रपटाच्या निर्मात्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

चित्रपटाचे पोस्टर पाहिल्यावर हा सिनेमा नक्कीच ऍक्शनपट असणार. पोस्टरवर पिळदार शरीरयष्टी असलेले दोन तरुण उभे असून त्यांच्या खांद्यावर जय जगदंब आणि जय दुर्गे असे लिहिले आहे. सोबतच समोर शिवाजी महाराजांचा पुतळा आणि एक किल्ला देखील दिसत आहे. त्यामुळे हे पोस्टर पाहून लोकांमध्ये चित्रपटाबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पोस्टरवरील गोष्टींवरून हा सिनेमा जरी ऍक्शन ड्रामा वाटत असला तरी हा कौटुंबिक सिनेमा देखील असणार आहे.

चित्रपटाचे निर्माते हरिओम घाडगे आणि दिग्दर्शक आशिष नेवाळकर यांनी सांगितले की, ” हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असलेल्या शिवाजी महाराजांच्या स्वभावाची अनेक वैशिष्ट्ये होती. शिवाजी महाराजांच्या अनेकविध गोष्टी आजही समाजाला प्रेरणा देतात. आमच्यासाठी देखील शिवाजी महाराज आमचे दैवतच आहे. त्यामुळे आम्ही आमची पहिली कलाकृती त्यांचा आशीर्वाद घेऊन सुरु करत आहोत. आज आमच्या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित होत असून, आम्ही ते पोस्टर महाराजांना समर्पित करीत आहोत. आम्ही आमच्या सिनेमातून महाराजांची तत्त्वे नक्कीच लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू.” तत्पूर्वी या चित्रपटाचे निर्माते असलेल्या हरिओम घाडगे यांनी तान्हाजी मालुसरेंच्या वास्तूचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले असून या शुभकामाचे भूमीपूजन झाले आहे. श्रीहरी स्टुडिओची प्रस्तुती असणारा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटाबाबतची अधिकची माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे.

संबंधित बातम्या 

लेकीला शिकवा, तिच्या पंखांना बळ द्या; अमृता फडणवीसांचा सल्ला!

डोळ्यावर गॉगल, ट्रॅडिशनल आऊटफिट; वरुण धवनच्या मेहंदीचे फोटो पाहिलेत का?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.