‘बॉईज 4’मधील आणखी एक धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

| Updated on: Oct 17, 2023 | 8:27 PM

'बॉईज' या चित्रपटाच्या तिन्ही भागांना प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटाचा चौथा भाग म्हणजेच 'बॉईज 4' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर हिट ठरत आहेत. यातील नवीन गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

बॉईज 4मधील आणखी एक धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
ye na raani song
Image Credit source: Youtube
Follow us on

मुंबई | 17 ऑक्टोबर 2023 : ‘बॉईज’ या चित्रपटाच्या सगळ्या भागांची खासियत म्हणजे त्यातील गाणी. या गाण्यांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं. ही गाणी, त्यातील हूक स्टेप हे ट्रेंडमध्येच असतात. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘बॉईज 4’मधील गाण्यांनीही संगीतप्रेमींना वेड लावलं आहे. आता ‘बॉईज 4’मधील प्रत्येकाला थिरकायला लावणारं ‘ये ना राणी’ हे पार्टी साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे आणि जुई बेंडखळे याच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्याला अवधूत गुप्तेचं जबरदस्त संगीत आणि बोल लाभलं आहे. तर अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या आवाजाने हे गाणं अधिकच जल्लोशमय झालं आहे. राहुल ठोंबरे यांनी या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे.

या गाण्याबद्दल संगीतकार अवधूत गुप्ते म्हणाले, “बॉईज 4 मधील दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ‘ये ना राणी तू ये ना ‘ आताच्या धकाधकीच्या जीवनात मूड फ्रेश करणारं हे गाणं आहे. तरूणाईला हे गाणं विशेष आवडणारं आहे. गाणं जरी भन्नाट असलं तरी याचं नृत्यदिग्दर्शनही तितकंच भारी आहे. मुळात हे गाणं करताना आम्हीही खूप धमाल केली आहे. मुलांनीही हे गाणं खूप एन्जॅाय केलं आहे. मला खात्री आहे, संगीतप्रेमींना हे गाणं तितकंच आवडेल.”

हे सुद्धा वाचा

अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी केली आहे. तर विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित या चित्रपटाचं लेखन हृषिकेश कोळी यांनी केलं आहे. या चित्रपटात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या 20 ऑक्टोबरला ‘बॉईज 4’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.