अमिताभ बच्चन यांनी ‘मोहब्बतें’साठी घेतला अवघा 1 रुपया ! कोणी केला खुलासा ?

यश चोप्रा यांच्या आवडत्या अभिनेत्यांच्या लिस्टमध्ये अमिताभ बच्चन यांचेही नाव होते. यश चोप्रा यांच्या दिग्दर्शित केलेला मोहब्बतें या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांनी घेतलेली फी हिंदी सिनेमाच्या कथांमध्ये कायमची नोंदवली गेली. अमिताभ बच्चन यांचाही यश चोप्रा यांच्यावर खूप विश्वास होता, म्हणून ...

अमिताभ बच्चन यांनी 'मोहब्बतें'साठी घेतला अवघा 1 रुपया ! कोणी केला खुलासा ?
अमिताभ बच्चन
Follow us
| Updated on: Dec 05, 2024 | 4:22 PM

हिंदी सिनेसृष्टीत आपलं नाव गाजवणारे बॉलिवूडचे बिग बी अर्थातच अमिताभ बच्चन यांनी ९० च्या दशकात भरपूर चित्रपट गाजवले आहेत. बिग बी यांची लोकप्रियता आजही कायम असून यांना बॉलिवूडचे महानायक याबरोबरच अँग्री यंग मॅन म्हणूनही ओळखले जाते. अशातच बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या खास मित्रांमध्ये अभिताभ बच्चन याचे नाव नेहमी असते. तर बिग बी यांनी यश चोप्रा यांनी बनवलेल्या अनेक चित्रपटात काम केले आहे. एवढंच नाहीतर त्यांनी केलेल्या या चित्रपटांनी त्यावेळेस बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.

बिग बी यांचा ‘मोहब्बतें’ चित्रपट आजही अनेक प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. या चित्रपटातील सर्वच कलाकारांचा उत्तम अभिनय यांमुळे लाखो चाहत्यांना आजही हा चित्रपट पुन्हा पाहावासा वाटतो. चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी नारायण शंकर हे पात्र साकारलं होतं. यावेळी बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक यश चोप्रा यांचा मुलगा आदित्य चोप्रा यांनी ९० च्या दशकात ‘मोहब्बतें’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. पण  या चित्रपटात काम करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी फक्त 1 रुपया घेतला आणि काम केलं आहे हे तुम्हाला माहितीय का?

दरम्यान हा संपूर्ण किस्सा निर्माते निखिल अडवाणी यांनी रेडिओ मिर्चीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. या मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी यश चोप्रा यांच्या खास मैत्रीच्या नात्याबद्दल आदर कसा केला आहे हे सांगितले. तसेच सिनेविश्वातील दोन काळांमधील फरक सांगताना त्यांनी अमिताभ बच्चन चित्रपटात काम करण्यासाठी फक्त १ रुपया घेऊन काम केलं आहे. हे एक उदाहरण त्यांनी यावेळी दिलं.

‘मोहब्बतें’साठी अमिताभ बच्चन यांनी घेतली एवढी कमी फी 

रेडिओ मिर्चीला दिलेल्या मुलाखतीत निखिल अडवाणीने यश चोप्रा आणि अमिताभ बच्चन यांच्यातील किस्सा सांगितला. निखिल अडवाणी म्हणाले, ‘सिलसिला चित्रपट बनत असताना यशजींनी अमिताभ बच्चन यांच्याकडे फी मागितली होती.’ यावर अमिताभ बच्चन म्हणाले की, ‘सध्या मला घर विकत घ्यायचे आहे, यामुळे मला तुमच्याकडुन चांगली रक्कम हवी आहे.’ यावर यश चोप्रा यांनी होकारार्थी उत्तर दिले

त्यानंतर जेव्हा मोहब्बतें या चित्रपटा दरम्यान यश चोप्रा यांनी पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांना फीबाबत प्रश्न विचारला असता, ‘मी तुमच्याकडे जे मागितले ते तुम्ही मला दिले, त्यामुळे यावेळी फक्त 1 रुपयात चित्रपट करणार आहे.’ असे सांगितले.

निखिल अडवाणी या मुलाखतीत सांगितले की, आधी चित्रपट पैशांवर नाही, तर लोकांच्या मनावर आणि नात्यांच्या मजबुतीवर टिकून असायचे. आजकाल सर्व काही पैशांवर ठरतं. आधी पैसे ठरतात आणि मग कोणता अभिनेता चित्रपटात काम करणार आणि कोण नाही करणार हे ठरतं,” त्याच बरोबर ‘दिलवाले दुल्हनियां’ व ‘मोहब्बतें’ या चित्रपटांची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. ‘पाम आंटी (पामेला चोपडा) नेहमी आम्हाला जेवण बनवून द्यायच्या. त्या प्रत्येकाची आवड-निवड विचारायच्या. ‘दिलवाले दुल्हनियां’ व ‘मोहब्बतें’ हे चित्रपट अशाच पद्धतीने बनले आहेत”, असंही निखिल अडवाणी म्हणाले.

निखिल अडवाणी हे चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक आहेत. 90 च्या दशकात निखिल अडवाणीयांनी यशराज फिल्म्स आणि धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत आपल्या करिअरची सुरुवात केली. यश चोप्रा, करण जोहर आणि आदित्य चोप्रा यांना असिस्ट देखील केले होते. निखिल अडवाणी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट ”कल हो ना हो” (२००३) हा सुपरहिट ठरला होता.

सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.