निक्की-अरबाजचं ब्रेकअप? नातं संपलं ; इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत म्हणाली,”प्रेमासाठी तो तयार नाही…”

निक्की-अरबाजच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. निक्कीने काही तासांपूर्वी शेअर केलेल्या स्टोरीमुळे अरबाज आणि तिच्यामध्ये काही ठीक नसल्याचे समजतेय. तिची स्टोरी पाहून त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

निक्की-अरबाजचं ब्रेकअप? नातं संपलं ; इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत म्हणाली,प्रेमासाठी तो तयार नाही...
Follow us
| Updated on: Dec 02, 2024 | 8:29 PM

‘बिग बॉस मराठी 5’ हे पर्व खूप गाजलं. यातील सर्वच स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केलं आहे. त्यात गाजलेलं कपल म्हणजे निक्की आणि अरबाज. निक्की तिच्या बोल्डनेस आणि भांडणांमुळे जेवढी चर्चेत तेवढीच ती अरबाजमुळेही चर्चेत राहिली. बिग बॉसच्या घरात सुरु झालेलं नातं त्याचे बाहेरही पाहायला मिळाले.

निक्की-अरबाजचं ब्रेकअप?

‘बिग बॉस मराठी 5’ संपल्यानंतर निक्की आणि अरबाजने नेहमीच एकमेकांसोबत वेळ घालवणे पसंत केले. तसेच मीडियासमोरही अनेकदा ते एकमेकांना आवडतात याची कबुली दिली. मात्र अनेकांनी यावर कमेंट केल्या होत्या की हे नातं घराबाहेर फार काळ टिकणार नाही. पण बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावरही ते नेहमीच एकत्र दिसत होते. त्यामुळे नक्कीच पुढे त्यांचे नाते लग्नापर्यंत जाईल अशी सर्वांनाच अपेक्षा होती.

मात्र निक्कीने केलेल्या एका पोस्टमुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आणि हे नात संपलंय का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण निक्कीने काही तासांपूर्वी एक स्टोरी शेअर केली ज्यामुळे अरबाज आणि तिच्यामध्ये काही ठीक नसल्याचे समजत आहे. तिची स्टोरी पाहून त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीमुळे चाहत्यांना धक्का

निक्कीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट रिपोस्ट केली होती. यामध्ये लिहिलं होतं की, “त्यांना एकटे सोडून द्या. कारण तुम्ही देत असलेल्या प्रेमासाठी ते अजूनही तयार नाही आहेत.’’ निक्कीची ही पोस्ट पाहून त्यांच्यात काहीतरी बिनसलंय का? असे प्रश्न चाहत्यांना पडला आहे. दरम्यान, निक्की आणि अरबाज या दोघांकडूनही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे त्यांच्यात नक्की सर्व अलबेल असावं अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.