Nita Amabni | सासू असावी तर अशी ! नीता अंबानींचं भावी सूनबाईवर किती प्रेम, राधिकाला गिफ्ट म्हणून आलिशान..

Anant Radhika Wedding : नीता आणि मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली आहे. जामनगरमध्ये हा कार्यक्रम ३ दिवस चालणार आहे. जुलै महिन्यात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं शानदार सोहळ्यात लग्न होणार असल्याचं वृत्त आहे.

Nita Amabni | सासू असावी तर अशी ! नीता अंबानींचं भावी सूनबाईवर किती प्रेम, राधिकाला गिफ्ट म्हणून आलिशान..
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 2:55 PM

Anant Radhika Wedding : देशातील नामवंत उद्योगपती आणि सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले, रिलायन्स इंडस्ट्रीचे मुकेश अंबानी आणि नीता अंबानी सध्या बरेच खुशीत आहे. त्यांच्या धाकट्या मुलाचं लग्न जे होतंय. नीता – मुकेश यांचा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची लेक राधिका यांच्या लग्नाच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. या सेलिब्रेशनसाठी फक्त देशातूनच नव्हे तर परदेशातूनही अनेक नामवंत व्यक्ती, सेलिब्रिटीज येणार असल्याचे वृत्त आहे. रिपोर्ट्सनुसार, येत्या जुलै महिन्यात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं शानदार सोहळ्यात लग्न होणार आहे.

लग्नानिमित्त संपूर्ण अंबानी कुटुंबात आनंदाचं वातावरण असून होणाऱ्या सुनबाईंवरही सासूबाई नीता अंबानी खूप खूश आहेत. त्यांनी होणारी सून, राधिका हिला खास गिफ्ट दिलं आहे.

सासू असावी तर…

हे सुद्धा वाचा

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शन्सच्या निमित्ताने अंबानी कुंटुबाने त्यांची होणारी सून राधिका हिला एक आलिशान कार गिफ्ट केल्याचे वृत्त आहे. या कारची किंमत तब्बल 4.5 कोटी रुपये असून देशातील केवळ काहीच व्यक्तींकडे ही कार आहे. त्यामध्ये क्रिकेटर विराट कोहली, अभिनेता आमिर खान आणि ज्युनिअर बच्चन, अर्थात अभिषेक बच्चन यांच्याकडे ही कार असल्याचे समजते. एवढंच नव्हे तर नीता अंबानी यांनी राधिका मर्चंट हिला लक्ष्मी-गणेश मूर्तीही भेट म्हणून दिली. त्या मूर्तीसोबत चांदीची तुळशीचीं कुंडीही त्यांनी गिफ्ट दिली. तसेच त्यासोबत चांदीचा स्टँडही आहे.

राधिकाला गिफ्ट केली ही कार

रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी भावी सुनेला 4.5 कोटी रुपये किंमतीची Bentley Continental GTC Speed ही ब्रिटीश कार गिफ्ट केली.  भारतामध्ये केवळ काही लोकांकडेच ही कार त्यांच्या ताफ्यात आहे. कोट्यवधी रुपयांच्या या कारची फीचर्स काय आहेत , तेही जाणून घेऊया.

बेंटले कॉन्टिनेंटल जीटी स्पीडचं इंजिन

या कारमध्ये 5950cc इंजिन आहे, जे 650 bhp पॉवर आणि 900 Nm पीक टॉर्क जनरेट करते. बेंटले कॉन्टिनेंटलचा स्पीड अवघ्या 3.6 सेकंदात 0-60 mph पर्यंत वेग वाढू शकतो.

बेंटले कॉन्टिनेंटल जीटी स्पीडचे फीचर्स

ही 4 सीटर पेट्रोल कार आहे.ती प्रति लिटरसाठी 12.9 किमी मायलेज देते. बेंटले कॉन्टिनेंटल जीटी स्पीडमध्ये मल्टी-फंक्शन स्टीअरिंग व्हील, पॉवर ॲडजस्टेबल एक्सटीरियर रिअर व्ह्यू मिरर, टचस्क्रीन, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, इंजिन स्टार्ट स्टॉप बटण, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, अलॉय व्हील आणि फॉग लाइट्स अशी अनक फीचर्स आहेत.

बेंटले कॉन्टिनेंटल जीटी स्पीड ही कार अँथ्रासाइट आणि आर्क्टिक कलर ऑप्शन या दोन कलर ऑप्शनमध्ये येते. लॅम्बोर्गिनी यूरूस, फेरारी आणि GTB V6 हायब्रिड सारख्या कारशी या कारची स्पर्धा आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.