Nitish Bhardwaj | दोन घटस्फोट, राजकारणातून संन्यास, आता IAS पत्नीमुळे चर्चेत.. महाभारतातील ‘कृष्णा’ची संपत्ती किती ?
Nitish Bhardwaj Net Worth : महाभारतामध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे नितीश भारद्वाज सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. नितीश भारद्वाज यांनी आयएसएस अधिकारी असलेल्या स्मिता गटे यांच्याशी विवाह केला होता. मात्र नंतर ते विभक्त झाले. आता नितीश यांनी त्यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत.
Nitish Bhardwaj | महाभारत मालिकेतील श्रीकृष्णाच्या भूमिकेमुळे केवळ लोकांच्या घरातच नव्हे तर त्यांच्या मनात पोहोचलेले अभिनेते नितीश भारद्वाज हे सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांची श्रीकृष्णाची भूमिका लोकांना इतकी आवडली होती, की लोक त्यांना देव मानून त्यांचीच पूजा करू लागले होते. बीआर चोप्रा यांच्या महाभारतमध्ये श्रीकृष्ण साकारून त्यांनी रसिकांच्या हृदयावर राज्य केले होते. मात्र आता नितीश भारद्वाज बरेच त्रस्त आहेत. त्यांनी त्यांच्या पत्नीवर गंभीर आरोप लावले आहेत.
महाभारतातील या ‘श्रीकृष्णा’च्या आयुष्यात भीषण गृहयुद्ध सुरू आहे. नितीश भारद्वाज यांनी पत्नी स्मिता गटे यांच्यावर त्यांचा मानसिक छळ केल्याचा आरोप लावला आहे. नितीश भारद्वाज यांनी आयएसएस अधिकारी असलेल्या स्मिता गटे यांच्याशी विवाह केला. मात्र काही वर्षांनी नात्यात वितुष्ट आल्याने 2019 साली ते विभक्त झाले. मात्र नितीश भारद्वाज पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात पोहचले आहे. त्यांनी स्मिता यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. नितीश भारद्वाज यांनी १४ फेब्रुवारी रोजी पोलीस आयुक्त हरिनारायण चारी मिश्रा यांची भेट घेऊन तक्रार नोंदवली. पत्नी स्मिता हिने आपल्या मुलींचे अपहरण केल्याचा आरोप भारद्वाज यांनी केला.
महाभारतामुळे मिळाली अफाट लोकप्रियता
नितीश भारद्वाज यांनी आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीवरून केली. महाभारतातील ‘कृष्ण’ म्हणजेच नितीश भारद्वाज यांचा जन्म 2 जून 1963 रोजी मुंबईत झाला. नितीश भारद्वाज यांनी टीव्हीपासून चित्रपट आणि राजकारणापर्यंत दीर्घ खेळी खेळली आहे. नितीश यांची कारकीर्द खूपच रंजक राहिली. आधी ते टीव्ही इंडस्ट्रीत प्रसिद्ध झाले, त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांत काम केलं आणि नंतर थेट राजकारणात उडी मारली.
राजकारणातून घेतला संन्यास
नितीश भारद्वाज यांनी राजकीय कारकीर्द बरीच यशस्वी ठरली. मात्र नंतर त्यांनी त्यातून पूर्णपणे निवृत्ती घेतली. सध्या ते चित्रपटसृष्टीत चांगलाच सक्रिय आहे. मात्र त्यांच्या राजकीय खेळीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. लोक त्यांना श्रीकृष्ण म्हणूनच अधिक ओळखतात. एकेकाळी नितीश भारद्वाज हे भारतीय जनता पक्षाचे सक्रिय नेते होते. चांगल्या कारकिर्दीनंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला. 1996 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी जमशेदपूर येथे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. 1999 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मध्य प्रदेशातील राजगड मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र तेव्हा ते तत्कालीन मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचे भाऊ लक्ष्मण सिंह यांच्याकडून पराभूत झाले.नितीश भारद्वाज हे भाजपचे प्रवक्तेही होते.
कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक
श्रीकृष्णाच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या नीतिश भारद्वाज यांनी अथक मेहनतीच्या जोरावर भरपूर पैसा कमावला, ते कोट्यवधींचे मालक आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नीतिश यांच्याकडे सुमारे 70 कोटी रुपयांची संपत्ती आहे. नीतिश यांनी आत्तापर्यंत दोन लग्न केली. मात्र दोन्ही वेळा त्यांचा घटस्फोट झाला. सध्या ते त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या वर्तनामुळे चर्चेत असून आपल्या जुळ्या मुलींना भेटता यावे यासाठी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.
नितीश भारद्वाज यांनी पोलीस आयुक्त हरिनारायण चारी मिश्रा यांची भेट घेऊन तक्रार नोंदवली. पत्नी स्मिता हिने मुलींचे अपहरण केल्याचा आरोप केला. कोर्टाच्या आदेशानंतरur स्मिता मला मुलींची भेटू घेऊ देत नाही. माझ्या दोन्ही मुली कुठे आहेत, कोणत्या परिस्थितीत आहेत, हे विचारल्यावर तिच्याकडून काहीच उत्तर मिळत नाही. ती माझ्या मुलींना माझ्याविरोधात भडकवत असते, असा आरोप त्यांनी केला होता. चार वर्षांपासून मुलींची भेट झाली नाही. यापूर्वी अनेक वेळा पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार दिली आहे. परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही, असेही त्यांनी तक्रारीत नमूद केले होते.