Nora Fatehi | गोल्डन ड्रेसमध्ये नोरा फतेहीचा जलवा, हॉटनेस पाहून चाहतेही झाले घायाळ!
नोराचा हा शिमरी गोल्डन लूक खास फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी तयार करण्यात आला होता. फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये नोराने गोल्डन हाय थाई स्लिट गाऊन घातला होता.
मुंबई : डान्सर-अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. ती दररोज तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे नोरा नेहमीच चर्चेचा भाग बनत असते. नुकतेच नोराने तिचे काही नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नोराचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. गोल्डन कलरच्या या ड्रेसमधले नोराचे बोल्ड लूकमधील हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत (Nora Fatehi golden slit dress look for filmfare award steals fans heart).
नोराचा हा शिमरी गोल्डन लूक खास फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी तयार करण्यात आला होता. फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये नोराने गोल्डन हाय थाई स्लिट गाऊन घातला होता. पुरस्कार सोहळ्यापूर्वीचा फोटो आणि व्हिडीओ नोरोने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अनेक सेलिब्रिटींनी नोराच्या या फोटोवर आणि व्हिडीओंवर कमेंट केल्या आहेत. नोराच्या चाहत्यांचे तिच्या या लूकवरून डोळेच हटत नाहीयत. तिच्या या फोटोला आतापर्यंत तब्बल 16 लाखाहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.
पाहा नोराचा गोल्डन लूक :
View this post on Instagram
मालदीव सुट्ट्यांवरून परतली नोरा
नोरा अलीकडे मालदीवमध्ये सुट्टीसाठी गेली होती. मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावरील बोल्ड फोटो आणि व्हिडीओंमुळे नोरा सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली होती. नोराची खासियत अशी आहे की, तिचा लूक प्रत्येक वेळी वेगळा आणि खास असतो. कधी ती बोल्ड लूकमध्ये, तर कधी पारंपारिक लूकमध्ये चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. नोराचा पारंपारिक अवतारही तिच्या चाहत्यांना खूप आवडतो (Nora Fatehi golden slit dress look for filmfare award steals fans heart).
‘बिग बॉस 9’ने मिळवून दिली ओळख
‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोच्या 9व्या पर्वात नोरा फतेही स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या शोने नोराला एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यानंतर ती ‘झलक दिखला जा’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये देखील दिसली होती. इथेच नोराने आपली नृत्य प्रतिभा जगासमोर सादर केली. ती एक उत्कृष्ट नर्तक असण्याबरोबरच मार्शल आर्टमध्येही ट्रेंड आहे.
कशी बनली ‘डान्सिंग क्वीन’
‘बाहुबली’सह अनेक चित्रपटांमध्ये नोराने विशेष भूमिका साकारल्या आहेत. ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटापासून नोराला तिच्या कारकीर्दीत एक नवीन आयाम मिळाला आहे. या चित्रपटात नोराने ‘दिलबर’ या गाण्याच्या रिक्रिएशनवर ठुमके लगावले होते. हे गाणे सुपरहिट ठरले. प्रत्येकजण तिच्या नृत्याचा आणि तिच्या अदांचे दिवाने झाले. या गाण्यानंतर नोराने कधीच मागे वळून पाहिले नाही.
यानंतर नोरा हिने ‘स्त्री’ या चित्रपटातील ‘कमरिया’, बाटला हाऊसमधील ‘ओ साकी सकी’, मरजावा मधील ‘एक तो काम जिंदगानी’ अशा ब्लॉकबर्स्टर गाण्यांवर नृत्य केले. याबरोबरच नोराने बर्याच अल्बममध्येही काम केले असून, तिचे सर्व अल्बम सुपरहिट ठरले आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणारी नोरा नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते.
(Nora Fatehi golden slit dress look for filmfare award steals fans heart)
हेही वाचा :
Holi 2021 | पांढरा शर्ट पाहून लहान मुलं म्हणाली ‘होली है’, रंग पाहताच श्रद्धा कपूरने काढला पळ!
संजय लीला भन्साळींच्या चित्रपटाला ‘मस्तानी’चा नकार, दीपिका-भन्साळींमध्ये कोल्डवॉर सुरु!