कतरिनाच्या नावाने माझी फसवणूक…अभिनेत्रीने सांगितलं बॉलिवूडचं काळं सत्य; डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी घेतली थेरपी
नोरा फतेहीने तिच्या सुरुवातीच्या बॉलिवूड प्रवासात अनेकांकडून फसवणूक आणि दिशाभूल झाल्याचे स्पष्ट केले आहे. कतरिना कैफसारखी बनवण्याचे आमिष दाखवून तिचा गैरफायदा घेतला गेला. यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती तसेच तिला यासाठी थेरपीही घ्यावी लागली होती.
अनेकजण मुंबईत बॉलिवूमध्ये आपलं नशीब आजमवायला अनेक स्वप्न घेऊन येतात. कुणाची ती स्वप्ने खरी होतात तर कोणाची फसवनूकहीहोते. असचं काहीसं घडलं होतं एका अभिनेत्रीच्या बाबतीत. जी खूप सारी स्वप्न घेऊन बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी आली होती. काम मिळण्यासाठी धडपडत होती. अशात तिला काम मिळणे लांबच पण तिची फसवणूक मात्र होऊ लागली. ती अभिनेत्री होती नोरा फतेही. जी आताची बॉलिवूडमध्ये एक उत्तम डान्सर आहे.
अनेक दिवस डिप्रेशन अन् उपचार
नोरा फतेही हे भारतीय चित्रपटसृष्टीत एक सुप्रसिद्ध नाव आहे. हिंदी, तेलगू, मल्याळम आणि तामिळ भाषेत तिनं आपली जादू दाखवली आहे.नोरा उत्तम डान्सर, मॉडेल, सिंगर, अभिनेत्री आणि निर्माता आहे. मात्र सुरुवातीच्या काळात तिची काम मिळण्यावरून अनेकांनी फसवणूक केल्यानं ती डिप्रेशनमध्ये गेली होती.
नोरा फतेहीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिचे मानसिक आरोग्य खूपच खालावले होते. तिला कतरिना कैफसारखे बनवू असे सांगून अनेकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. यामुळे अभिनेत्री डिप्रेशनमध्ये गेली होती आणि तिला यावर उपचारही घ्यावे लागले होते.
नोराने हेही सांगितले की, ती अनेक एजंटना भेटत असे ज्यांनी मोठ्या प्रोडक्शन हाऊसचा हवाला देऊन सांगितले की ते तिला पुढची कतरिना कैफ बनवतील. या लालसेपोटी त्यांची अनेकवेळा फसवणूक करून फायदा घेतला गेला.
अनेकांनी दिशाभूल करत फसवणूक केली
मेलबर्नमध्ये राजीव मसंद यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान नोरा फतेहीने सांगितले की, जेव्हा ती तिच्या करिअरच्या शोधात कॅनडातून भारतात आली, तेव्हा तिला अनेक गोष्टींची माहिती नव्हती. ज्या लोकांकडून ती तिच्या करिअरबाबत मदत घेत होती ते लोक तिची फसवणूक करत होते. तिचा गैरफायदा घेत होते. नोरा तेव्हा 22 वर्षांची होती आणि तिच्या निरागसतेचा वापर स्वत: च्या फायद्यासाठी कोण करत आहे आणि तिला मूर्ख बनवत आहे हे तिला पुरेसे समजले नाही. असं नोराने या मुलाखती दरम्यान आपलं मन मोकळं केलं आहे.
संघर्षाने नोराला काय शिकवले?
नोरा या फसवणूकीमुळे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली होती. तिला थेरपी घ्यावी लागली होती. या संघर्षातून नोराला खूप काही शिकता आलं. तिने लोकांना सल्ला दिला की यश मिळण्यास उशीर झाला तरी कधीही निराश होऊ नका आणि नेहमी सकारात्मक राहा. मागच्या वेळी ती मरगाव एक्सप्रेस या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती. सध्या ती ‘डान्सिंग डॅड’ या चित्रपटाचा एक भाग असणार आहे. तसेच नोरा ‘मटका’ या चित्रपटाद्वारे तेलुगुमध्ये पदार्पण करणार आहे.