कोण आहे गोंडस हिरो रघू? पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटकांची झुंबड, सोशल मीडियावरही कौतुकाची बरसात
Oscar 2023: ऑस्कर पुरस्कार २०२३ मध्ये भारताच्या द एलिफंट व्हिस्परर्स ने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्रीचा पुरस्कार मिळवला आहे. या ऐतिहासिक लघुपटात कामगिरी करणाऱ्या हिरोची सध्या जगभरात जोरदार चर्चा आहे.
The Elephant Whisperers Oscar Award 2023 | ऑस्कर पुरस्कारांमध्ये बेस्ट डॉक्युमेंट्री (Best Short film) फिल्मचा पुरस्कार मिळवलेली भारताची (India) डॉक्युमेंट्री जगजभरात चर्चेचा विषय ठरली आहे. द एलिफंट व्हिस्परर्स नावाच्या या डॉक्युमेंट्रीचा विषय आणि त्यातील हिरोवर सिनेशौकिनांकडून चर्चा सुरु आहे. या लघुपटात एक अनाथ हत्ती आणि एका गरीब दाम्पत्याची कथा रंगवण्यात आली आहे. लघुपटात दाखवण्यात आलेल्या हत्तीच्या पात्राचं नाव रघू आहे. ज्या परिसरात या डॉक्युमेंट्रीचं चित्रण झालं, त्या भागात रघू तर हिरोच बनलाय आणि आता ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर देश-विदेशातील चाहत्यांकडून रघू नेमका कोण आहे, कुठे राहतो, हे पाहण्यासाठी गर्दी होतेय. अनेक चित्रपट प्रेमी तर तमिळनाडूत रघूच्या भेटीसाठी येण्याचा प्लॅन करतायत.
रघूला पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड
जगातला प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्यानंतर द एलिफंट व्हिस्परर्स लघुपटातील रघूला भेटण्यासाठी विदेशी पर्यटकांची झुंबड उडतेय. लंडनहून भारतात आलेल्या एका महिलेने नुकतीच यावरून प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, मी लंडनहून आले आहे. इथे आल्यावर येथील दोन बेबी एलिफंटनी ऑस्कर जिंकल्याचं कळलं. मला हत्ती खूप आवडतात. त्यामुळे मी ऑस्कर जिंकलेल्या हत्तीची लगेच भेट घेतली.
“I am from London, we visited here and got to know that two baby elephants from here won an Oscar last night. It is nice to see them, and I really enjoyed seeing them. Elephants are my favourite animal. I am very lucky to see them today,” said a tourist Grace (13.03) pic.twitter.com/nc9Gjn3yyJ
— ANI (@ANI) March 14, 2023
तमिळनाडूत चित्रीकरण
द एलिफंट व्हिस्परर्स लघुपटाचं शूटिंग तमिळनाडूच्या नीलगिरी पर्वत परिसरात झालं आहे. मुदुमलाई टायगर रिझर्व्ह येथील थेप्पाकडू एलिफंट कँपमध्ये हे चित्रीकरण झालंय. आशियातील हा सर्वात जुना एलिफंट कँप आहे. जवळफास १०५ वर्षांपूर्वीचा. त्यामुळे इथे अनेक प्रकारचे, विविध स्वभावांचे हत्ती आहेत. यातूनच एका हत्तीची निवड या लघुपटाच्या चित्रीकरणासाठी करण्यात आली.
रघू काय खातो?
आशिया खंडातील या सर्वात जुन्या एलिफंट कँपमध्येच रघू हत्ती राहतो. त्याचं डाएटसुद्धा खूप विशेष आहे. हिरवं गवत, रागी, भात, गुळ, खनिजयुक्त अन्नपदार्थ,नारळ आणि ऊस असा त्याचा आहार आहे. रघूचा स्वभाव येथील इतर हत्तींप्रमाणेच प्रेमळ आहे.
5 वर्षे अभ्यास
ऑस्कर पुरस्कार मिळवलेल्या या डॉक्युमेंट्रीचं चित्रीकरण करण्यासाठी दिग्दर्शिकेने खूप मेहनत घेतली आहे. दिग्दर्शिका कार्तिकी गोंसाल्विस यांनी तब्बल ५ वर्षे या एलिफंट कँपमध्ये वास्तव्य केलं. येथील बारकावे टिपले. त्यानंतरच चित्रीकरण सुरु केलं. अनाथ हत्ती रघू आणि त्याचा सांभाळ कऱणाऱ्या दाम्पत्याच्या जीवनावर आधारीत हे कथानक आहे. स्वतःवर ओढवलेल्या असंख्य अडचणींचा सामना करत हे दाम्पत्य रघूचा सांभाळ करते, हे यातून दाखवण्यात आले आहे.