Abhay Season 3 | ‘अभय’ वेब सीरीजच्या तिसऱ्या सीझनची घोषणा, सुपरकॉप बनून कुणाल खेमू सोडवणार प्रकरण!

| Updated on: Oct 29, 2021 | 5:29 PM

भारतातील सर्वात मोठ्या देशांतर्गत OTT प्लॅटफॉर्म ZEE5 ने वेब सीरीज ‘अभय’सह 2019 मध्ये क्राइम थ्रिलर स्पेसमध्ये एक बेंचमार्क सेट केला आहे. या शोने 2020 मध्ये आणखी एका यशस्वी सीझनसह पुनरागमन केले, ज्यानंतर चाहत्यांची उत्सुकता वाढली.

Abhay Season 3 | ‘अभय’ वेब सीरीजच्या तिसऱ्या सीझनची घोषणा, सुपरकॉप बनून कुणाल खेमू सोडवणार प्रकरण!
Kunal Khemu
Follow us on

मुंबई : भारतातील सर्वात मोठ्या देशांतर्गत OTT प्लॅटफॉर्म ZEE5 ने वेब सीरीज ‘अभय’सह 2019 मध्ये क्राइम थ्रिलर स्पेसमध्ये एक बेंचमार्क सेट केला आहे. या शोने 2020 मध्ये आणखी एका यशस्वी सीझनसह पुनरागमन केले, ज्यानंतर चाहत्यांची उत्सुकता वाढली. नवीन सीझनची प्रतीक्षा आता अधिकृतपणे कमी झाली आहे, कारण कलाकार आणि क्रू यांनी ‘अभय 3’चे शूटिंग सुरू केले आहे.

कुणाल खेमू तपास अधिकारी अभय प्रताप सिंह म्हणून परतत आहेत. ज्याच्याकडे क्रिमिनल माइंड आहे आणि तो केस सोडवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. शा नेगी, निधी सिंग, ऋतुराज सिंग आणि एलनाज नौरोजी, जे पहिल्या सीझनचा भाग होते, सीझन 3 मध्ये देखील त्यांच्या यशस्वी पात्रांसह परततील. याशिवाय नवीन कलाकारांचाही समावेश करण्यात येणार आहे, मात्र त्यासंबंधीची माहिती आतापर्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती.

शोचे शूटिंग झाले सुरू

पहिल्या दोन सीझनचे दिग्दर्शन करणारा केन घोष या यशस्वी फ्रँचायझीच्या तिसऱ्या सीझनचेही दिग्दर्शन करत आहे. पहिले दोन सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले, कारण ते इतर कोणत्याही क्राइम थ्रिलरपेक्षा वेगळे होते आणि आता 2022 मध्ये ‘अभय 3’ देखील असाच काहीसा हटके असणार आहे.

दिग्दर्शक केन घोष म्हणतात की, ‘हे त्या सर्व मित्र, चाहते आणि हितचिंतकांसाठी आहे जे आम्हाला विचारत होते की आम्ही अभय 3चे शूटिंग कधी सुरू करणार? हे अधिकृतपणे घोषित करायचे आहे की, आम्ही शूटिंग सुरू केले आहे आणि लवकरच तुमचा आवडता गुप्तहेर ‘अभय 3’मधून तुमच्या भेटीला परत येईल.’

‘अभय 3’च्या तिसर्‍या सीझनसह मी आनंदी : कुणाल खेमू

कुणाल खेमूने शेअर केले की, ‘एवढी आवडती फ्रँचायझी बनलेल्या सीरीजचा एक भाग म्हणून मी खूप रोमांचित आणि कृतज्ञ आहे. या फ्रँचायझीचा मुख्य भाग बनणे ही एक कमाल भावना आहे. मी अभय 3चे शूटिंग सुरू करत असताना, मला माझ्या चाहत्यांकडून असेच प्रेम आणि कौतुक मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यांनी आम्हाला इथवर आणले आहे.’

ZEE5 इंडियाचे बिझनेस ऑफिसर मनीष कालरा म्हणाले की, “देशातील सर्वात मोठे देशांतर्गत डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म म्हणून, नवीन आणि मनोरंजक सामग्री प्रदान करण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो आणि अभयसह, आम्ही क्राइम थ्रिलर प्रकारातील उद्योगासाठी एक बेंचमार्क स्थापित केले आहे. ZEE5 च्या सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय फ्रँचायझींपैकी एक असलेल्या अभयने त्याच्या अनोख्या चित्रणातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आणि, अभय 3 सह देखील, आम्ही तुम्हाला स्क्रीनशी जोडून ठेवण्याचे वचन देतो.’

हेही वाचा :

Aryan Khan Bail | आर्यन खानचा जामीन आदेश जारी, तुरुंगाबाहेर येण्यासाठी मान्य कराव्या लागल्या ‘या’ अटी!

Shahrukh Khan Son : आर्यन खानला मिळाला जामीन, शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबरामने केलं असं सेलिब्रेशन, पाहा फोटो