Rudra | ओटीटीवर धमाका करण्यासाठी अजय देवगण तयार, सीरीजमध्ये दिसणार जबरदस्त भूमिकेत!

चित्रपटांमध्ये आपली जादू विखुरल्यानंतर, अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आता ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये धमाका करण्यास सज्ज झाला आहे. ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर ‘रुद्र- द एज ऑफ डार्कनेस’ (Rudra The Edge of Darkness) नावाची एक क्राईम ड्रामा सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Rudra | ओटीटीवर धमाका करण्यासाठी अजय देवगण तयार, सीरीजमध्ये दिसणार जबरदस्त भूमिकेत!
अजय देवगण
Follow us
| Updated on: Apr 20, 2021 | 12:58 PM

मुंबई : चित्रपटांमध्ये आपली जादू विखुरल्यानंतर, अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आता ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये धमाका करण्यास सज्ज झाला आहे. ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर ‘रुद्र- द एज ऑफ डार्कनेस’ (Rudra The Edge of Darkness) नावाची एक क्राईम ड्रामा सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अजय देवगण या सीरीजमधून ओटीटीवर डेब्यू करत आहे. हॉटस्टारच्या या स्पेशल सीरीजची निर्मिती सध्या जोशात सुरू असून, मुंबईतील बर्‍याच आयकॉनिक लोकेशन्समध्ये या सीरीजची शूटिंग होणार आहे. बर्‍याच चित्रपटांत पोलिसांची भूमिका साकारणारा अजय देवगण आता एक नवीन आणि प्रखर पोलीस अधिकारी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे (Ajay Devgn entering in digital platform with his new series Rudra the edge of darkness).

ही एक वेगळी कॉप स्टोरी असेल ज्याची कथा आणि कथेचे स्वरुप खूप वेगळे असेल. यातून अजय ‘रुद्र’च्या अवतारात मोठा धमाका करणार आहे. या थ्रिलर आणि क्राईम ड्रामात अजयला पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक झाले आहेत. ही नवी वेब सीरीज लोकप्रिय ब्रिटीश मालिका ‘लूथर’वरून प्रेरित आहे.

नव्या भूमिकेबाबत अजय म्हणतो…

यावर अजय म्हणाला, ‘प्रेक्षकांना वेगळी कथा दाखवण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. या माध्यमातून आम्हाला भारतीय प्रेक्षकांचे आणखी मनोरंजन करायचे आहे. डिजिटलचे जग मला खूप आकर्षित करत होते आणि मी या सीरीजमध्ये काम करण्यास उत्सुक आहे. तसेच, पडद्यावर पोलिसांची भूमिका निभवायची असे मला सांगितले नाही, परंतु या वेळी हे पात्र थोडे तीव्र, गुंतागुंतीचे आणि अधिक गडद असेल. मला याबद्दल सर्वात विशेष वाटले ते म्हणजे ‘रुद्र’ आतापर्यंतचे सर्वात भिन्न ग्रे-शेड पात्र असेल.’

या सीरीजमध्ये अजयसमवेत अभिनेत्री इलियाना डिक्रूझही महत्त्वाच्या भूमिकेत दिसू शकते, असे वृत्त आहे. इलियानाने यासाठी खरोखर संपर्क साधला आहे. मात्र, या मालिकेत काम करण्यासाठी अभिनेत्रीने हो म्हटलं आहे की नाही, याबद्दल अद्याप काही माहिती नाही (Ajay Devgn entering in digital platform with his new series Rudra the edge of darkness).

कोव्हिडमुळे थांबले ‘मे डे’चे शूटिंग

अजय देवगण दिग्दर्शित ‘मे डे’ चित्रपटाचे शूटिंग डिसेंबरमध्ये सुरू झाले होते. कालांतराने अजयने चित्रपटाचे अनेक मोठे भाग शूट केले होते. अंतिम वेळापत्रकात टीम एप्रिलमध्ये शेवटचे तीन दिवस दोहा येथे जाणार होती, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे अजयने दोहाचे वेळापत्रक थांबवले आहे. अशा परिस्थितीत त्याला कोणतीही जोखीम घ्यायची नाही.

अशी आहे ‘मे डे’ची कहाणी

‘मे डे’ या अजय देवगण दिग्दर्शित चित्रपटाविषयी बोलायचे तर हा 2015 मध्ये घडलेल्या एका खऱ्या घटनेवर आधारित आहे. जेव्हा दोहा-कोचीकडे जाणारी उड्डाणे कमी दृश्यात्मकतेमुळे थांबवली गेली होती, त्यानंतर ती दक्षिण भारतातील दुसर्‍या विमानतळावर वळवली गेली. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे चित्रीकरण भारतातील अनेक विमानतळांवर केले जाणार होते. परंतु, कोरोना साथीच्या आजारामुळे हे होऊ शकले नाही. ज्यामुळे अजय देवगणने हैदराबादमध्ये विमानतळाचे सेट तयार केले.

(Ajay Devgn entering in digital platform with his new series Rudra the edge of darkness)

हेही वाचा :

Babil Khan | …म्हणून इरफान खानच्या आठवणी शेअर करणं सोडून दिलं, लेक बाबिलने सांगितले कारण

बॉलिवूडचं ‘परफेक्ट कपल’ ऐश्वर्या-अभिषेक बच्चन, जाणून घ्या त्यांच्या ‘हॅप्पी मॅरीड लाईफ’चं गुपित…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.