Bigg Boss OTT 3 पाहायला मिळणार पाच मोठे बदल; स्पर्धकांना मोबाईल वापरता येणार?
Bigg Boss OTT 3 Host by Anil Kapoor : बिग बॉस हा कार्यक्रम प्रेक्षकांना आवडतो. या कार्यक्रमातील घडामोडींकडे प्रेक्षकांची बारीक नजर असते. आता बिग बॉस ओटीटीचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमात बरेच मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. वाचा सविस्तर...
बिग बॉस ओटीटीचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. उद्या म्हणजेच 21 जूनपासून रात्री 9 वाजता हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अवघे काही तास यासाठी उरले आहेत. बिग बॉस या रिअॅलिटी शोचा वेगळा चाहता वर्ग आहे. या कार्यक्रमाची मागच्या कित्येक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. अखेर आता हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉसचे सगळे सिझन जरा हटके असतात. बिग बॉस ओटीटीचा हा तिसरा सिझनही खूपच खास असणार आहे. या सिझनमध्ये पाच वेगळ्या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
कार्यक्रमाचा होस्ट
बिग बॉस या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन जरी सलमान खान करत असला तरी बिग बॉस ओटीटीचं सूत्रसंचालन मात्र दुसरे कलाकार करताना दिसतात. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सिझनचं सूत्रसंचालन हे करन जोहरने केलं होतं. तर दुसरा सिझन सलमान खानने होस्ट केला होता. यंदा तिसऱ्या भागात मात्र अभिनेता अनिल कपूर हा कार्यक्रम होस्ट करणार आहे.
मोबाईलचा वापर
बिग बॉस हा रिअॅलिटी शो आहे. या कार्यक्रमात कोणतंही मनोरंजनाची वस्तू नेता येत नाही. सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यातही जर तुम्हाला या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर तुमचे फोन घराच्या बाहेर ठेवून जावं लागतं. मात्र बिग बॉस ओटीटी 3 साठी झालेल्या पत्रकार परिषदेत अनिल कपूर यांना फोनच्या वापराबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा असं गरजेचं नाही की जे इथून मागे झालं. तेच यापुढेही या कार्यक्रमात होईल. या सिझनमध्ये काही खास घडेल. सगळं काही बदललं जाईल, असं अनिल कपूरने सांगितलं.
जनतेची पावर
या सिझनमध्ये जनतेच्या म्हणजेच प्रेक्षकांच्या हातात काही गोष्टी असणार आहेत. या शोमधील स्पर्धकांना काही टास्क देण्याचा अधिकार प्रेक्षकांना असेल. शिवाय प्रेक्षकांना काही खास अधिकार दिले जातील. यामुळे कार्यक्रमाचं स्वरूप पूर्णपणे बदलून जाईल.
मीम आणि ट्रोलर्सनाही प्लॅटफॉर्म
बिग बॉस ओटीटी सिझन 3 मध्ये मीम आणि स्पर्धकांना ट्रोल करणाऱ्यांनादेखील खास स्थान असेल. ते या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग असतील.
जीतो धन धना धन…
अनिल कपूर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. त्यामुळे ‘झकास’, ‘धिना धिन धा’ या शब्दांचा वापर केला जाणारच आहे. या कार्यक्रम बघण्यासाठी जिओचं सबस्क्रिप्शन घेणाऱ्यांना ‘जीतो धन धना धन’ हा एक रंजक स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे.