OTT Release | ‘हेल्मेट’पासून ‘सिंड्रेला’पर्यंत, या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणाऱ्या चित्रपटांची यादी

आता ऑगस्ट महिना संपला आहे आणि सप्टेंबर महिना सुरू होणार आहे. अशा स्थितीत, या आठवड्यात OTT वर रिलीज झालेल्या आणि होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरीजबद्दल जाणून घेऊया... 

OTT Release | ‘हेल्मेट’पासून ‘सिंड्रेला’पर्यंत, या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणाऱ्या चित्रपटांची यादी
OTT Release
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 7:38 AM

मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सध्या सर्व काही बंद आहे. त्याचा विशेष परिणाम चित्रपट जगतावरही दिसून आला. साथीच्या आजारामुळे चित्रपटगृहे पूर्णपणे बंद होती. अशा परिस्थितीत, निर्मात्यांनी वेब सीरीज आणि चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेतला. पण, आता हे व्यासपीठ लोकांसाठी मनोरंजनाचे प्रमुख माध्यम बनले आहे.

गेल्या काही वर्षांपासून नेटफ्लिक्स, Amazon प्राइम, हॉटस्टारसारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सीरीज आणि चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यामुळे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची कमतरता नाही. आता ऑगस्ट महिना संपला आहे आणि सप्टेंबर महिना सुरू होणार आहे. अशा स्थितीत, या आठवड्यात OTT वर रिलीज झालेल्या आणि होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरीजबद्दल जाणून घेऊया…

थिमारुसू

सत्यदेव स्टारर तेलुगु चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर एक महिन्यानंतर OTT वर रिलीज होणार आहे. या चित्रपटात वकिलाची भूमिका साकारताना सत्यदेव कोर्टरूमच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी भ्रष्टाचाराविरोधात लढताना दिसनार आहे. शरण कोप्पीशेट्टी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात प्रियांका जावळकरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 28 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर याचा प्रीमियर होईल.

हेल्मेट

अपारशक्ती खुराना आणि प्रनूतन बहल हे साताराम रमानी यांच्या ‘हेलमेट’ या पहिल्या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या मालिकेची कथा कंडोम खरेदी करण्याचा पारंपारिक मार्ग दाखवते आणि सामाजिक संदेश देखील देते. मित्रांचा गट पैसे कमवण्यासाठी ई-कॉमर्सचा ट्रक लुटतो, पण त्यांना त्यातील बॉक्समध्ये कंडोम सापडतात, अशी याची कथा आहे. ‘हेल्मेट’ 3 सप्टेंबर रोजी Zee5 वर रिलीज होत आहे.

ब्लॅक विडो

‘ब्लॅक विडो’ हा मार्वलचा चित्रपट निर्मितीनंतर थिएटर रिलीजसाठी तयार होता, परंतु कोरोनामुळे ही योजना बिघडली. आता हा चित्रपट 3 सप्टेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात स्कार्लेट जोहानसन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात नताशा अॅव्हेंजर्स बनण्याआधीची कथा दाखवली जाईल.

सिंड्रेला

कॅमिला कॅबेलोचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सिंड्रेला’ 3 सप्टेंबर रोजी Amazon प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. आधुनिक सिंड्रेलावर आधारित या चित्रपटात अभिनेत्री कॅमिला कॅबेलो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय इदिना मेंझेल, मिनी ड्रायव्हर, निकोलस गॅलिट्झिन, बिली पोर्टर आणि पियर्स ब्रॉस्ननसारखे कलाकारही चित्रपटात दिसतील.

शांग-ची अँड द लिजेंड ऑफ द टेन रिंग्ज

मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा पहिला आशियाई सुपरहिरो, ‘शांग-ची अँड द लीजेंड ऑफ द टेन रिंग्ज’ 3 सप्टेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होईल. हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये उपलब्ध असेल. या चित्रपटात अभिनेता सिमू लियू मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा :

रांगड्या जोडीचा ‘राजेशाही’ थाट, राणा दा आणि पाठक बाईंचं नवं रॉयल फोटोशूट पाहिलंत का?

Hostel Life web Series | ‘गर्ल्स हॉस्टेल’ ते ‘कोटा फॅक्ट्री’, हॉस्टेल लाईफवर बनवलेल्या ‘या’ वेब सीरीज करतील जुन्या आठवणी ताज्या!

दत्तात्रेयांच्या ध्येयवेड्या भक्तांचे अवधूत चिंतन!, दत्त संप्रदायासाठी नवं ओटीटी चॅनेल सुरू!

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.