Lockupp Show : “मी 10 वर्षांचा मुलगा असताना माझ्यासोबत छेडछाड झाली” साईशा शिंदेचा मोठा खुलासा
लॉकअप शोचा सर्वत्र बोलबाला आहे.या कार्यक्रमात अनेक नवनव्या गोष्टींचा खुलासा केला जातोय. साईशा शिंदे हिच्यासोबत घडलेली एक गोष्ट समोर आली आहे. तिच्यासोबत छेडछाड झाली असल्याचं तिने सांगितलं आहे.
मुंबई : लॉकअप शोचा (Lockupp show) सर्वत्र बोलबाला आहे.या कार्यक्रमात अनेक नवनव्या गोष्टींचा खुलासा केला जातोय. या कार्यक्रमातील स्पर्धकांच्या वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी आता सार्वजनिक होत आहेत. कॉस्ट्युम डिझायनर साईशा शिंदे (Saisha Shinde) हिच्यासोबत घडलेली एक गोष्ट समोर आली आहे. साईशा शिंदे ही आधी स्वप्नील म्हणजेच मुलगा होती. तेव्हा तिच्यासोबत छेडछाड झाली असल्याचं तिने सांगितलं. तेव्हा साईशा केवळ 10 वर्षांची होती. तिच्या घरातीलच एका व्यक्तीने तिच्यासोबत हा घृणास्पद प्रकार केला. पण ती घरातील सदस्यांपैकी एक असल्याने साईशाने त्याचं नाव जाहीर केलेलं नाही.
10 वर्षांची असताना छेडछाड
लॉकअप शोमधून बाहेर जाण्यापासून वाचण्यासाठी स्पर्धकांना आपल्या आयुष्यातील गुपितांचा खुलासा करण्याचा पर्याय होता. यावेळी साईशा शिंदेने आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत खुलासा केला. साईशा शिंदे ही आधी स्वप्नील म्हणजेच मुलगा होती. तिने सर्जरीच्या माध्यमातून आपल्यात बदल घडवून आणला. तेव्हा तिच्यासोबत छेडछाड झाली असल्याचं तिने सांगितलं. तेव्हा साईशा केवळ 10 वर्षांची होती. तिच्या घरातीलच एका व्यक्तीने तिच्यासोबत हा घृणास्पद प्रकार केला. पण ती घरातील सदस्यांपैकी एक असल्याने साईशाने त्याचं नाव जाहीर केलेलं नाही.
ज्याने आपल्या सोबत हा सगळा प्रकार केला, लॉकअपमधून बाहेर पडल्यानंतर त्या व्यक्तीशी बोलणार असल्याचं साईशाने सांगितलं. ज्या व्यक्तीने साईशासोबत छेडछाड केली तो व्यक्ती तिच्यापेक्षा वयाने मोठा असल्याचंही तिने सांगितलं.
कोण आहे साईशा शिंदे?
साईशा शिंदे ही एक कॉस्ट्युम डिझायनर आहे. तिच्या कामाबद्दल सर्वत्र कौतुक होतं. साईशा एक उत्तम डिझायनर आहे. हरनाझ संधूने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला, तेव्हा तिने साईशाने डिझाईन केलेला ड्रेस घातला होता. साईशा शिंदे ही आधी स्वप्नील होती. तिने सर्जरीच्या माध्यमातून आपल्यात बदल घडवून आणला. आता ती मुलगी म्हणून तिला हवं तसं आयुष्य जगते. तिच्यातल्या या बदला बद्दल साईशा सांगते की, “मी मुलगा म्हणून असताना माझी घुसमट व्हायची आता मुलगी म्हणून जगताना मला खूप चांगलं वाटतं.”