रिक्षा चालक बनला यूट्यूबर…; फॉलोव्हर्सचा आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
Youtuber Mohamed Irfan : किराणा उधारीवर आणणारा रिक्षा चालक बनला युट्यूबर...; लाखांच्या घरात फॉलोव्हर्स.. कोण आहे हा यूट्युबर? सामान्य रिक्षा चालक ते प्रसिद्ध यूट्यूबर... कसा बनला यूट्युबर? सोशल मीडिया आणि यूट्यूबवर कसं मिळवलं हे यश? वाचा सविस्तर...
सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून तुम्ही जगभरात प्रसिद्ध होऊ शकता… तुमची एखादी पोस्ट लाखो लोक वाचू शकतात. शिवाय या सगळ्याला अनेकांनी आपला फुटटाईम व्यवसाय बनवतात. यातून लाखो रुपये अन् प्रचंड नाव कमवतात. असाच एक तरूण सध्या चर्चेत आहे. मोहम्मद इरफान… इरफान सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. सामान्य रिक्षा चालक ते प्रसिद्ध युट्यूबर असा मोहम्मद इरफानचा प्रवास राहिला आहे. त्याचा हा प्रवास प्रचंड प्रेरणादायी आहे. इरफानने लाखो फॉलोव्हर्स कसे मिळवले? वाचा त्याचा संपूर्ण प्रवास…
सामान्य रिक्षा चालक ते प्रसिद्ध यूट्यूबर
‘इरफान्स व्ह्यू’ हे मोहम्मद इरफान याचं यूट्यूब चॅनेल आहे. इरफानला स्वत:ला खाण्याची प्रचंड आवड आहे. त्याचं यूट्यूब चॅनेलही फुडशी संबंधित आहे. यूट्यूबवर त्याचे 40 लाख फॉलोव्हर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर त्याचे साडे नऊ लाख फॉलोव्हर्स आहेत.
इरफान हा मूळचा चेन्नईचा… शाळेत असताना अभ्यासात तो साधारण होता. त्याला अभिनेता व्हायचं होतं. पण मग परिस्थितीमुळे त्याला रिक्षा चालवावी लागली. तो शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ने-आण करण्याचं काम करतो. अगदी घरात लागणारा किराणा देखील तो उधारीवर आणायचा.
…अन् इरफान यूट्यूबर झाला
इरफानचे वडील हे व्हॅन ड्रायव्हर होते. ते स्कूल व्हॅन आणि रिक्षा चालवालयचे. ते मुलांना शाळेत न्यायचे अन् आणायचे. तीन वर्ष इरफाननेही रिक्षा चालवली. सकाळी अन् दुपारी शाळकरी मुलांना ने-आण करण्याचं काम इरफानने केलं. नोव्हेंबर 2016 ला त्याने व्लॉगर म्हणून काम करायला सुरुवात केली. यूट्यूब चॅनेल अधिकाधिक लोकांचा प्रतिसाद मिळावा म्हणून त्याने मेहनत घेतली.
आधी व्लॉगर म्हणून काम करायला इरफानने सुरुवात केली. नंतर तो फूड व्लॉगर झाला. पुढे सिनेमांचा रिव्ह्यूव तो करू लागला. नंतर विविध भागांना त्याने भेटी दिल्या तिथली खाद्यसंस्कृती त्याने लोकांसमोर आणली. परदेशातही त्याने भेटी दिल्या. या शिवाय तो सेलिब्रिटींच्या मुलाखतीही घेऊ लागला. त्यामुळे दक्षिण भारतासह देशाच्या इतर भागातही तो प्रसिद्ध झाला. 2024 चा नॅशनल क्रिएटर अवॉर्ड देखील इरफानला मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचा सन्मान झाला.
एका कॉल सेंटर कंपनीमध्ये इरफान काम करायचा. पण आपण प्रसिद्ध व्हावं. लोकांनी आपल्याला लोकांनी ओळखावं, अशी त्याची प्रचंड इच्छा होती. म्हणून त्याने यूट्यूबला व्हीडिओ पोस्ट करायला सुरुवात केली. आठवड्याला एक व्हीडिओ तो शूट करायला अन् लगेच त्याचदिवशी तो पोस्ट करायचा. पण मग त्याने स्वत: च्या व्हीडिओवर काम करायला सुरुवात केली. अन् सातत्याने त्याने आपले व्हीडिओ शेअर केले. यानंतर लोक त्याला ओळखू लागले.