मालिकेतून काढून टाकलं, चोरीचे आरोप केले पण ती खचली नाही; अभिनेत्री ते युट्यूबर उर्मिला निंबाळकरचा प्रवास

Urmila Nimbalkar Struggle Actress to YouTuber Journey : अभिनेत्री होण्याचं स्वप्न उराशी बाळगून त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली. मात्र अभिनेत्री होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. मग तिने नवा मार्ग निवडला. प्रसिद्ध युट्यूबर उर्मिला निंबाळकरचा स्ट्रगल तुम्हाला माहितीये का?

मालिकेतून काढून टाकलं, चोरीचे आरोप केले पण ती खचली नाही; अभिनेत्री ते युट्यूबर उर्मिला निंबाळकरचा प्रवास
Follow us
| Updated on: Mar 17, 2024 | 10:08 AM

मुंबई | 17 मार्च 2024 : आपण एखादं स्वप्न पाहातो, ते पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत असतो. पण बरेचदा मेहनत घेऊनही हवं ते यश मिळत नाही. कधी-कधी कितीही पाठलाग केला तरी ती स्वप्न पूर्ण होत नाहीत. मग आपण खचून जातो. आपण काहीही करू शकत नाही, असं वाटू लागतं. मात्र अशावेळी नवी संधी खुणावत असते. ती संधी ओळखायची अन् त्याचं सोनं करायचं असंच काहीसं उर्मिला निंबाळकरच्या जर्नीकडे पाहिलं की वाटतं. अभिनेत्री असणाऱ्या उर्मिला निंबाळकरने यूट्यूबर होण्याचं ठरवलं तो काळ तिच्यासाठी प्रचंड खडतर होता. आपण शून्य आहोत. आपल्याला काहीही जमत नाही, असं उर्मिलाला वाटत होतं. पण त्यातून तिने नवा मार्ग स्विकारला अन् आता उर्मिला निंबाळकर ही देशातल्या प्रसिद्ध युट्युबरपैकी एक आहे.

मालिकेतून काढलं

उर्मिला एका मालिकेत काम करत होती. अचानक एक दिवशी जेव्हा ती सेटवर गेली होती. तेव्हा तिच्या कुणी नीट वागेना. तिचा मेकअप कुणी करत नव्हतं. तिला तुटक वागणूक दिली गेली आणि तिला सांगण्यात आलं की तिला मालिकेतून काढून टाकण्यात आलं आहे. यावेळी कुणाही व्यक्तीला वाटेल तशाच उर्मिलाच्याही मनात भावना आल्या. तिच्या पायाखालची जमीन सरकली. आता सगळं संपलं असं तिला वाटत होतं.

अन् ती डिप्रेशनमध्ये गेली…

उर्मिला वारंवार आजारी पडते. तिच्यामुळे सेटवरच्या लोकांना त्रास होतो. बरेच आरोप उर्मिलावर करण्यात आले. एकढंच नव्हे तर ती स्वत: हून मालिका सोडत आहे, असं लिहून घेण्यात आलं. यानंतर उर्मिलाला प्रचंड मानसिक त्रास झाला. तिने सेटवरून लिपस्टिक चोरी केल्याचा आरोपही करण्यात आला. तिची बॅग चेक केली तर त्यात ते सापडलं नाही. ती डिप्रेशनमध्ये गेली.

अभिनेत्री ते यूट्यूबर

एके दिवशी तिला वाटलं की यूट्यूब चॅनेल सुरू करावं आणि तिने उर्मिला निंबाळकर या नावाने यूट्यूब चॅनेल सुरु केलं. आधी या यूट्यूब चॅनेलला हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. पण आता तिच्या या यूट्यूब चॅनेलने एक मिलियन सबस्क्रायबर्सचा टप्पा पूर्ण केला आहे. अभिनेत्री ते प्रसिद्ध यूट्यूबर हा तिचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.