Netflix : नेटफ्लिक्सचे सब्सस्क्रायबर्स घटले, काय आहे कारण? चर्चेतली कंपनी संकटात कशी?

| Updated on: Apr 21, 2022 | 12:56 PM

जगभरातील देशांमध्ये वाढती महागाई, राशिया-युक्रेन युद्ध आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील तीव्र स्पर्धा यामुळे नेटफ्लिक्सच्या सब्सस्क्रायबर्सच्या संख्येत घट झाली आहे, असं नेटफ्लिक्स इंकने म्हटलंय. त्यामुळे कंपनीसमोर नवं संकट उभं राहिलंय.

Netflix : नेटफ्लिक्सचे सब्सस्क्रायबर्स घटले, काय आहे कारण? चर्चेतली कंपनी संकटात कशी?
Netflix
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : अलीकडे अनेकांना आणि विशेष म्हणजे तरुणांना चित्रपट किंवा मालिकांपेक्षा वेब सीरिज (web series) पाहणं आवडायला लागलं आहे. कोणत्या वेब सीरिजचं नाव घेतलं की नेटफ्लिक्सचा (Netflix) किस्सा किंवा त्या कंपनीचं नाव चटकन तोंडात येतं. इतकी आपल्याला नेटफ्लिक्सची सवय झालेली आहे. पण, याच नेटफ्लिक्सचे सब्सस्क्रायबर्स (subscribers) घटल्याचं समोर आलंय. नेटफ्लिक्स इंकने म्हटलंय की, जगभरातील देशांमध्ये वाढती महागाई, राशिया-युक्रेन युद्ध आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील तीव्र स्पर्धा यामुळे नेटफ्लिक्सच्या सब्सस्क्रायबर्सच्या संख्येत घट झाली आहे. तर दुसरीकडे नेटफ्लिक्सनं असं म्हटलंय की, आगामी काळात वाढत्या स्पर्धेमुळे त्यांत्या ग्राहकांची  संख्या आणखी कमी होऊ शकते. यामुळे सध्या ही कंपनी चांगलीच चर्चे आली आहे. नेटफ्लिक्स लोकप्रिय असल्याने देखील त्यांचे ग्राहक का घटतायेत? नेटफ्लिक्सने केलेल्या दाव्यांवर कितपत लक्ष ठेवायचं, यावरही अलीकडे चर्चा रंगली आहे.

40 अब्ज डॉलर्सचे नुकसान

कोरोनाकाळात जगभरातील लोक त्यांच्या घरात बंद होते. तेव्हा नेटफ्लिक्सच्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढली होती. तेव्हा लोकांकडे वेब सीरिज पाहिल्याशिवाय पर्याय नव्हता. आता मात्र, थोडी वेगळी बातमी आहे. मंगळवारी नेटफ्लिक्सचे शेअर्स 26 टक्क्यांनी घसरले. यामुळे शेअर बाजारातील नेटफ्लिक्सच्या मूल्याला सुमारे 40 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

2 लाख ग्राहक कमी झाले

नेटफ्लिक्सने या वर्षी जानेवारीत सांगितलं की, ग्राहकांच्या संख्येत वाढीचा वेग मंदावला आहे.  यामुळे आतापर्यंत कंपनीचे निम्मे मूल्य कमी झाले आहे. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 2 लाख ग्राहक कमी झाल्याचे नेटफ्लिक्सनं म्हटलं. नेटफ्लिक्सचा उपक्रम 25 लाख सदस्य जोडण्याची होती. आताच्या परिस्थितीवरुन पूर्णपणे विपरीत परिणाम कंपनीवर झाल्याचं दिसतंय. रशिया-युक्रेन युद्धानंतर नेटफ्लिक्सने रशियामध्ये सेवा निलंबित केली आहे आणि यामुळे 7 लाख ग्राहकांचे नुकसान त्यांना त्याठिकाणी झाले आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम

राशिया-युक्रेन युद्ध आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील तीव्र स्पर्धा यामुळे नेटफ्लिक्सच्या ग्राहकांच्या संख्येत घट झाली आहे. तर दुसरीकडे नेटफ्लिक्सनं असं म्हटलंय की, आगामी काळात वाढत्या स्पर्धेमुळे त्यांत्या ग्राहकांची  संख्या आणखी कमी होऊ शकतो. यामुळे सध्या ही कंपनी चांगलीच चर्चे आली आहे. त्यामुळे नेटफ्लिक्स लोकप्रिय असल्याने देखील त्यांचे ग्राहक का घटातायेत? नेटफ्लिक्सने केलेल्या दाव्यांवर कितपत लक्ष ठेवायचं, यावरही अलीकडेच चर्चा रंगली आहे. मंगळवारी नेटफ्लिक्सचे शेअर्स 26 टक्क्यांनी घसरले. यामुळे शेअर बाजारातील नेटफ्लिक्सच्या मूल्याला सुमारे 40 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

इतर बातम्या

Titwala : टिटवाळ्यात तरूणांच्या दोन गटात बाचाबाची, रात्री खरंच झाला का गोळीबार ?

Bank Jobs : ‘अनुभवी’ उमेदवारांनो इकडं लक्ष द्या ! नोकरी बँकेची, कसा आणि कुठे अर्ज करायचा जाणून घ्या …

Devendra Fadnavis: वसुली रॅकेटमुळे पोलिसांच्या बदल्या केल्या का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल