Akash Thosar | आर्चीचा परश्या आता कुस्तीच्या आखाड्यात, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटाने महाराष्ट्रातच नाही तर, अवघ्या देशात आणि परदेशातही मराठी मनोरंजन विश्वाची दाखल घ्यायला लावली. या चित्रपटातून ‘आर्ची’ आणि ‘परश्या’ ही दोन्ही पात्र घराघरांत पोहोचली.

Akash Thosar | आर्चीचा परश्या आता कुस्तीच्या आखाड्यात, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
आकाश ठोसर
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 12:07 PM

मुंबई : नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटाने महाराष्ट्रातच नाही तर, अवघ्या देशात आणि परदेशातही मराठी मनोरंजन विश्वाची दखल घ्यायला लावली. या चित्रपटातून ‘आर्ची’ आणि ‘परश्या’ ही दोन्ही पात्र घराघरांत पोहोचली. चित्रपट प्रदर्शित होऊन इतकी वर्षे उलटली असतानाही, त्यांच्या प्रसिद्धीत अद्याप तसूभरही कमतरता आलेली नाही. या चित्रपटानंतर ‘आर्ची’ साकारणाऱ्या अभिनेत्री रिंकू राजगुरूने आणखी काही मराठी चित्रपटांमधून अभिनय केला, तर ‘परश्या’ साकारणारा अभिनेता आकाश ठोसरही वेब सीरीजच्या विश्वात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत आहे (Parshya Fame actor Akash Thosar share kusti video on social media).

मराठमोळा अभिनेता आकाश ठोसर नुकताच ‘1965 द वॉर इन द हिल्स’ या वेब सीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात आकाश एका सैनिकाच्या भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटात त्याचा हटके लूक दिसतो आहे. या दरम्यान त्याने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. यामध्ये तो कुस्ती खेळताना दिसला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप चर्चेत आहे.

पाहा आकाशचा ‘हा’ व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Akash Thosar (@akashthosar)

(Parshya Fame actor Akash Thosar share kusti video on social media)

काय म्हणाला आकाश?

आकाश ठोसरने कुस्ती खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या सोबतच त्याने खास कॅप्शन देखील लिहिले आहे. हा व्हिडीओ शेअर करताना आकाश म्हणतो, ‘खास माझ्या मातीतल्या पैलवान मित्रांसाठी…!! लहानपणापासूनच कळत-नकळत मातीचा लळा लागला. वडलांनी माझ्या आणि त्यांच्या हौशेपोटी तालमीत पाठवलं. तालमीत 5 वर्ष काढली.’तालीम’ जोर,बैठका, डावपेच,शिस्त या पलीकडेही बरंच काही देऊन गेली.

तालमीतलं हसतं-खेळतं वातावरण, एकाच ध्येयाने पेटून उठलेले पैलवान सवंगडी, रोज न चुकता करायचा सराव,गप्पा-गोष्टी…अशा सगळ्या आठवणी अजूनही सोबत आहेत. लाल मातीच्या स्पर्शात एक वेगळीच ताकद आणि ऊर्जा आहे.आणि त्यामुळेच मी इथपर्यंत आलो.या लाल मातीचा आणि माझ्या गुरुजनांचा,पैलवान मित्रांचा माझ्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. आणि त्याचाच उपयोग आज मला या कला क्षेत्रात होतोय (Parshya Fame actor Akash Thosar share kusti video on social media).

या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला या मातीत रुजायला,खेळायला आणि लढायला शिकवलं त्या सर्व माझ्या मातीतल्या माणसांना प्रणाम आणि धन्यवाद… खरंतर आभार, धन्यवाद हे शब्द कितीही केलं तरी तुम्हा सगळ्यांसाठी अपुरे आहेत…तरीही तुमचा सर्वांचा मी सदैव ऋणी राहील आणि मातीशी हे माझं नातं असच घट्ट राहील.

अभिनेता आकाश ठोसर याची ‘1965 द वॉर इन द हिल्स’ ही वेब सीरीज 26 फेब्रुवारी रोजी हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात आली. त्यात आकाशने एका सैनिकांची भूमिका साकारली आहे. या वेब सीरीजचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले असून, त्यात अभय देओल, सुमित व्यास, माही गिल, रोहन गंडोत्रा, अनूप सोनी हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये झळकले आहेत.

(Parshya Fame actor Akash Thosar share kusti video on social media)

हेही वाचा :

Zimma : ‘खास महिलांची खास धमाल’, महिला दिनानिमित्त ‘झिम्मा’चा टिझर रिलीज

बबड्या कायम एक नंबर, ‘अग्गंबाई सासूबाई’च्या चित्रिकरणाचा लास्ट डे, आशुतोष पत्कीला आठवणींचा उमाळा

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.