Marathi Web Series : मराठी प्रेक्षकांसाठी नवी कोरी वेब सीरीज, ‘जॉबलेस’चं शूटिंग सुरू

सध्या सर्वत्र वेब सीरीजचे वारे वाहत आहेत. नवनवीन वेब सीरीज प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरत आहेत. अशात जगभरातील मराठी प्रेक्षकांसाठी लवकरच एक नवीन वेब सीरीज येत आहे. (Shooting of Marathi Web Series 'Jobless')

Marathi Web Series : मराठी प्रेक्षकांसाठी नवी कोरी वेब सीरीज, 'जॉबलेस'चं शूटिंग सुरू
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 11:29 AM

मुंबई : सध्या सर्वत्र वेब सीरीजचे वारे वाहत आहेत. नवनवीन वेब सीरीज प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरत आहेत. अशात जगभरातील मराठी प्रेक्षकांसाठी लवकरच एक नवीन वेब सीरीज येत आहे. प्लॅनेट मराठी एकापेक्षा एक दर्जेदार वेब सीरीज प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. यापैकी तिसऱ्या वेब सीरीजचं म्हणजेच ‘जॉबलेस’च्या शूटिंगचा श्रीगणेशा नुकतंच पुण्यात झाला. ‘जॉबलेस’ नावाची ही वेब सीरीज सस्पेंस क्राईम थ्रिलर जॉनरमधली असून यात सुव्रत जोशी प्रमुख भुमिकेत असणार आहे. एक चुकीचा निर्णय कसा गुन्हेगारीच्या दुनियेतील चक्रव्यूहात अडकवू शकतो, अशी या सीरीजची कथा आहे. (Shooting of Marathi Web Series ‘Jobless’)

‘हे’ धमाकेदार कलाकार मिळून गाजवणार वेब सीरीज  

Jobless

कुठलीही वेब सीरीजमध्ये कलाकार त्यांच्या अभिनयानं एक वेगळी जादू दाखवत असतात. तर ‘जॉबलेस’ या वेब सीरीजमध्ये सुव्रत बरोबर हरीश दुधाडे, पुष्कर श्रोत्री, मयुरी वाघ, स्वप्नाली पाटील, राधा धरणे हे कलाकाराही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

‘जॉबलेस’ची कथा सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी माणसाची

‘जॉबलेस’ची कथा ही एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी माणसाची आहे, जो एका छोट्याशा नजरचुकीनं गुन्हेगारीच्या चक्रव्युहात अडकत जातो, त्यातून तो जितकं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो तितकाच तो त्या दलदलीत अडकत जातो, ही कथा काही अंडरवर्ल्डची नाही, परंतु, ज्या पद्धतीची गुन्हेगारी या सिरीजमध्ये दाखवण्यात येणार आहे ती मराठी प्रेक्षकांनी या आधी क्वचितच कुठल्या सिनेमात किंवा वेब सीरीजमध्ये अनुभवली असेल.

ही वेब सीरीज 7 भागांची

ही वेब सीरीज सात भागांची असून याचे दिग्दर्शन निरंजन पत्की यांनी केलंय. तर, अमित बैचे, पिनाक बडवे, श्रीपाद दीक्षित, क्षीतिज कुलकर्णी यांनी निर्मात्याची तर सिद्धार्थ राजाराम घाडगे यांनी असोसिएट प्रोड्युसरची धुरा सांभाळली आहे. सुनील खरे हे डीओपी असतील. ही वेब सीरीज लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

Amruta Fadnavis | ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’, अमृता फडणवीसांचे नवे गाणे प्रदर्शित!

Saina Trailer | ‘जागतिक महिला दिना’चे औचित्य साधत ‘सायना’चा धडाकेबाज ट्रेलर प्रदर्शित, पाहा हा ट्रेलर…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.