गायक स्वप्नील बांदोडकरचं ‘सांग प्रिये’ रोमॅन्टिक सॉन्ग रिलीज, सप्तसूर म्युझिकची निर्मिती

गायक स्वप्नील बांदोडकरचा 'सांग प्रिये' हा नवा अल्बम सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गालावर खळी, राधा ही बावरी अशी उत्तमोत्तम गाणी स्वप्नीलने या आधी दिली आहेत. त्याच्या या नव्य अल्बमलाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.

गायक स्वप्नील बांदोडकरचं 'सांग प्रिये' रोमॅन्टिक सॉन्ग रिलीज, सप्तसूर म्युझिकची निर्मिती
'सांग प्रिये'- गाणं, स्वप्नील बांदोडकर
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 9:39 AM

मुंबई : गायक स्वप्नील बांदोडकरचा (Swapnil Bandodkar) ‘सांग प्रिये’ (Sang Priye) हा नवा अल्बम सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या नव्या म्युझिक अल्बमसाठी त्याने आवाज दिला आहे. कोमल खिलारे (Komal Khilare) आणि सोहम चांदवडकर (Soham Chandwadkar) ही नवी जोडी त्यात झळकली असून, सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांना या गाण्याचा आस्वाद घेता येईल. कोमल ही डॉक्टर तर सोहम हा पायलट असून दोघेही प्रसिद्ध मॉडेल आहेत. गालावर खळी, राधा ही बावरी अशी उत्तमोत्तम गाणी स्वप्नीलने या आधी दिली आहेत. त्याच्या या नव्य अल्बमलाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. “सांग प्रिये, प्रेम आपुले कधी कुठे गं सांडले” असे या शब्दाचे बोल आहेत. गाणं आवडल्याचं अनेकांनी कमेंट करून सांगितलं आहे.

साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष आणि सप्तसूर म्युझिकने या म्युझिक अल्बमची निर्मिती केली आहे. लीना कुलकर्णी यांनी गीतलेखन केलं आहे, तर अमेय मुळे यांनी संगीत रचना, निखील श्रीधर यांनी संगीत निर्मिती केली आहे. आजवर स्वप्नील बांदोडकरनं अनेक हिट गाणी गायलेली आहेत. प्रेमगीत ही स्वप्नीलची खासियत आहे. त्यामुळे स्वप्नील तरुण-तरुणींचा लाडका गायक आहे.

सांग प्रिये हा म्युझिक अल्बमही प्रेमगीतच असल्यानं स्वप्नीलनं अतिशय उत्तमरीत्या हे गाणं गायलं आहे. त्याशिवाय फ्रेश जोडी, उत्तम शब्द आणि संगीत, सुखद दृश्य यांचा मिलाफ या म्युझिक व्हिडिओमध्ये झाला आहे. त्यामुळे स्वप्नील जोशीच्या आवाजातील या म्युझिक व्हिडिओला प्रेक्षकांची दाद मिळेल यात शंका नाही.

गालावर खळी, राधा ही बावरी अशी उत्तमोत्तम गाणी स्वप्नीलने या आधी दिली आहेत. त्याच्या या नव्य अल्बमलाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.

संबंधित बातम्या

विद्यार्थी आंदोलनांमध्ये सतत दिसणारा ‘गोड’ चेहरा, स्वरा भास्करचं जेएनयूशी नातं काय?

Video: अंडरवॉटर फोटोशूट कसं केलं जातं? पहा ‘बिहाइंड द सीन्स’ व्हिडीओ!

नम्रता मल्लाचा ग्लॅमरस अंदाज; लेटेस्ट फोटोंवर चाहते घायाळ

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.