Tandav Controversy | ‘तांडव’च्या वादांचे तांडव सुरूच!  अ‍ॅमेझॉनच्या अपर्णा पुरोहितांच्या याचिकेची सुनावणी लांबणीवर!

‘तांडव’ या वेब सीरीजवरुन ‘अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ इंडिया’च्या अडचणी वाढत आहेत. अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ इंडियाच्या कंटेंट हेड अपर्णा पुरोहित यांनी आता ‘तांडव’ वेब सीरीज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Tandav Controversy | ‘तांडव’च्या वादांचे तांडव सुरूच!  अ‍ॅमेझॉनच्या अपर्णा पुरोहितांच्या याचिकेची सुनावणी लांबणीवर!
'तांडव'च्या निर्मात्यांनी अटकेपासून संरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र, आता न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावल्याने 'तांडव'च्या निर्मात्यांचा पाय आणखीनच खोलात रुतला आहे.
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 4:20 PM

मुंबई : ‘तांडव’ या वेब सीरीजवरुन ‘अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ इंडिया’च्या अडचणी वाढत आहेत. अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ इंडियाच्या कंटेंट हेड अपर्णा पुरोहित यांनी आता ‘तांडव’ वेब सीरीज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर आज (3 मार्च) सुनावणी होणार होती. मात्र, ती सुनावणी आता गुरुवारी होणार आहे. सुप्रीम कोर्ट अपर्णा यांच्या याचिकेवर विचार करेल आणि तिला अटकेपासून सुटका देईल का? की अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयासह ते पुढे जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे (Tandav Controversy Aparna purohit challenge Allahabad hc decision in Supreme court).

यापूर्वी या खटल्याची सुनावणी बुधवारी होणार होती, परंतु अपर्णा यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, ते आज दुसर्‍या एका प्रकरणात व्यस्त आहेत, म्हणून उद्या अर्थात गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी करा. त्यानंतर, कोर्टाने त्यांचे अपील स्वीकारले आणि उद्या सुनावणीसाठी तारीख निश्चित केली. अलाहाबाद हायकोर्टाने काही दिवसांपूर्वी अपर्णाची अग्रिम जामीन याचिका फेटाळून लावली होती. अ‍ॅमेझॉनवर प्रदर्शित होणाऱ्या वेब सीरीजना ग्रीन सिग्नल देण्याची जबाबदारी आपली असल्याची जबाबदारी अपर्णाने घेतली आहे. निर्माते त्यांच्या परवानगीनंतरच याचे शूट करतात. याचा अर्थ असा की या वेब सीरीजमध्ये कोणता कंटेंट दाखवला गेला आहे, त्या सर्वांची जबाबदारी अपर्णाच्या खांद्यावर आहे.

‘अ‍ॅमेझॉन प्राईम इंडिया’चे स्टेटमेंट

अ‍ॅमेझॉन प्राईम इंडियाने आपले नवीन विधान प्रसिद्ध करत म्हटले आहे की, ‘अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘तांडव’ सीरीजतील काही काल्पनिक दृश्ये प्रेक्षकांना आक्षेपार्ह वाटल्यामुळे, पुन्हा दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे आमचे उद्दीष्ट कधीच नव्हते आणि ज्या दृश्यांवर आक्षेप घेण्यात आले, ते हटवले किंवा संपादित केले गेले आहेत.’

निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, ‘आम्ही आमच्या प्रेक्षकांच्या वैविध्यपूर्ण श्रद्धांचा आदर करतो आणि या दृश्यांनी दु:खी झालेल्यांची बिनशर्त माफी मागतो.’ आमचा कार्यसंघ कंपनीच्या सामग्री मूल्यांककाचे अनुसरण करतो, जे आम्हाला आमच्या प्रेक्षकांची अधिक चांगली सेवा करण्यास सांगतात. आम्ही आमच्या भागीदारांसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत राहू.’ (Tandav Controversy Aparna purohit challenge Allahabad hc decision in Supreme court)

‘या’ दृश्यावर उडाली होती खळबळ!

वास्तविक, वेब सीरीजमध्ये मोहम्मद झीशान अयूब भगवान शिवाच्या भूमिकेत नाटक करताना दाखवलेला आहे. या सीनला कॉलेजच्या कॅम्पसमध्ये थिएटर फेस्टिव्हल म्हणून शूट केले गेले आहे. वेब सीरीजमधील या दृश्यात भगवान शिव आणि भगवान राम यांचा अपमान झाल्याचा आरोप आहे. ‘तांडव’मधील एका दृश्यात ‘नारायण-नारायण. देवा काहीतरी कर. रामजींचे अनुयायी सोशल मीडियावर सतत वाढत आहे’, अशा आशयाचा एक संवाद आहे. या संवादासोबातच, इतर बरेच संवाद देखील वादात अडकले आहेत. हा वाद इतका वाढला की, माहिती व प्रसारण मंत्रालयालाही या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला होता.

निर्मात्याने मागितली माफी!

ही वेब सीरीज पूर्णपणे फिक्शन आहे. या सीरिजमधील घटनेचा कोणत्याही जिवीत व्यक्ती वा एखाद्या घटनेशी संबंध नाही. असलास तर तो योगायोग समजावा. कोणत्याही व्यक्ती, जाती, समुदाय आणि धार्मिक भावनांना ठेच पोहोचवण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही सर्व तक्रारी समजून घेतल्या असून कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही सर्वांची विना अट माफी मागत आहोत, असं जफर यांनी म्हटलं होते. शिवाय या वादानंतर ‘तांडव’मधून ही दृश्ये देखील काढून टाकण्यात आली होती.

(Tandav Controversy Aparna purohit challenge Allahabad hc decision in Supreme court)

हेही वाचा :

कंगनाशी पंगा, मोदी सरकारविरोधी भूमिका, तापसीच्या धाडीचं राजकीय कनेक्शन? किती कमाई? वाचा सविस्तर

Video : जान्हवी कपूरच्या पहिल्याच आयटम साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.