Padmini Kolhapure | प्रेमात कुटुंबियाचाही पडला विसर, दुसऱ्या अभिनेत्रीचे कपडे-दागिने घालून केला प्रेम विवाह

पद्मिनी कोल्हापुरे हिच्या अदांनी, अभिनयाने सर्वांनाच वेड लावलं. मात्र प्रेमात पडताच तिने घरदार सर्व सोडल्याने लोक हैराण झाले होते.

Padmini Kolhapure | प्रेमात कुटुंबियाचाही पडला विसर, दुसऱ्या अभिनेत्रीचे कपडे-दागिने घालून केला प्रेम विवाह
Follow us
| Updated on: Aug 14, 2023 | 1:23 PM

Padmini Kolhapure Unknown Facts : 80च्या दशकांत पद्मिनी कोल्हापुरे (Padmini Kolhapure) यांची जादू सर्वांवर होती. त्यांचे लाखो चाहते होते. पण त्या ज्यांच्या प्रेमात पडल्या, ते तिच्याच चित्रपटाचे प्रोड्युसर होते. आजच्याच तारखेला पद्मिनी कोल्हापुरे यांनी आयुष्यातील नव्या पर्वाची सुरूवात केला होती. मात्र तेव्हा त्यांचे कुटुंबिय सोबत नव्हते. जादू

अवघ्या 15 व्या वर्षी सुरू केला अभिनय

पद्मिनी कोल्हापुरे यांनी जेव्हा सिनेसृष्टीत पहिले पाऊल ठेवले, तेव्हा त्या अवघ्या १५ वर्षांच्या होत्या. मात्र लवकरच त्या खूप यशस्वी ठरल्या. त्याचवेळी 1986 मध्ये आलेला ‘ऐसा प्यार कहां’ हा चित्रपट पद्मिनी कोल्हापुरे यांच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा असा चित्रपट ठरला. खरंतर प्रदीप शर्मा या चित्रपटाचे निर्माते होते. पद्मिनी आणि प्रदीप यांची पहिली भेट सेटवर झाली होती, त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

प्रेमासाठी सोडली कुटुंबाची साथ

अवघ्या २१ व्या वर्षी पद्मिनी कोल्हापुरे यांनी आयुष्याचा पुढला टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला. 14 ऑगस्ट 1986 रोजी वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी पद्मिनी आणि प्रदीप शर्मा यांनी लग्न केलं. मात्र यावेळी तिचे कुटुंबिय तिच्यासोबत नव्हते. लग्नासाठी ती घरदार, सर्व सोडून पळून गेली होती.

दुसऱ्या अभिनेत्रीचे कपडे, दागिने घालून केलं होतं लग्न

आपलं प्रेम मिळवण्यासाठी पद्मिनी कोल्हापुरेंना खूप संघर्ष करावा लागला. कारण तिचे कुटुंबिय तिच्यासोबत नव्हते. अखेर बॉलिवूडमधील तेव्हाची प्रसिद्ध अभिनेत्री पूनम धिल्लो यांनी पद्मिनी कोल्हापुरे यांची मदत केली. पद्मिनी आणि प्रदीप शर्मा यांच्या लग्नावेळेस पूनम यांनी पद्मिनीला त्यांचे कपडे आणि दागिने दिले होते.याचा खुलासा खुद्द पूनम धिल्लो यांनीच एका मुलाखतीत केला होते. पद्मिनी आणि प्रदीप शर्मा यांना प्रियांक नावाच एक मुलगाही आहे

अनेक विवादांमध्ये अडकले होते पद्मिनी यांचे नाव

पद्मिनी कोल्हापुरे या अनेक वादात सापडल्या आहेत. खरे तर 1980 मध्ये प्रिन्स चार्ल्स भारत दौऱ्यावर आले असताना पद्मिनी कोल्हापुरे यांनी त्यांचे जबरदस्तीने चुंबन घेतले. या मुद्द्यावरून बराच वाद झाला होता आणि पद्मिनी यांच्यावर बरीच टीकाही झाली होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.