पाकिस्तानी अभिनेत्याचं भारतीयांकडूनही कौतुक; पाकिस्तानी शोमध्ये म्हटली सरस्वती वंदना, व्हिडीओ व्हायरल

सध्या पाकिस्तानी अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अभिनेत्याने पाकिस्तानी शोमध्ये अस्खलित संस्कृतमधून "सरस्वती वंदना" म्हटली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं. भारतीय नेटकऱ्यांनी देखील या अभिनेत्याचं कौतुक केलं आहे.

पाकिस्तानी अभिनेत्याचं भारतीयांकडूनही कौतुक; पाकिस्तानी शोमध्ये म्हटली सरस्वती वंदना, व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Jan 28, 2025 | 9:35 PM

अनेक पाकिस्तानी कलाकारांनी बॉलिवूडमध्ये काम केलं आहे, अनेक सेलिब्रिटींनी लोकप्रियता मिळवली असून चाहता वर्ग भारतातही फार मोठ्या प्रमाणावर होता. मात्र 2016 मध्ये उरी येथे भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतातील विविध कलाकार आणि चित्रपट संघटनांनी पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम करण्यास बंदी घातली होती.

तेव्हापासून पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूमध्ये काम दिलं जात नाही. भारत-पाकिस्तानचे संबंध सुधरत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानी कलाकारांना काम देणार नाही असं ठरवलं होतं. ते्व्हापासून पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये जास्त काम मिळत नाहीये.

पाकिस्तानी अभिनेता सध्या चर्चेत 

मात्र असा एक पाकिस्तानी अभिनेता आहे ज्याचं कौतुक आज भारतीयसुद्धा करत आहे. हा पाकिस्तानी अभिनेता सध्या चर्चेत आहे. कारण या अभिनेत्याने चक्क संस्कृतमध्ये सरस्वती वंदना म्हटली आहे. हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटलं.

या अभिनेत्याचे नाव आहे अली खान. अली खान पाकिस्तानी अभिनेता असून त्याने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. अली खान याने पाकिस्तानी शोमध्ये अस्खलित संस्कृतमध्ये “सरस्वती वंदना” गायली आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

पाकिस्तानी अभिनेत्यानं अस्खलित संस्कृतमधून “सरस्वती वंदना” म्हटली

अली खानने एका न्यूज चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी अली खाननं त्याला उर्दू, हिंदी आणि संस्कृत या तिन्ही भाषेचं ज्ञान असल्याचं सांगितलं. यानंतर त्याला संस्कृतमधून काहीतरी बोलण्यास सांगितले. तेव्हा त्याने चक्क अस्खलित संस्कृतमधून “सरस्वती वंदना” म्हणून दाखवली. यावेळी तो शेवटचे काही शब्द विसरला. पण तरीही त्याचे उच्चार आणि चोख पाठांतर बघून प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

View this post on Instagram

A post shared by 365 News (@365.newspk)

 नेटकऱ्यांकडून अली खानचं कौतुक 

एक पाकिस्तानी अभिनेता संस्कृत बोलतोय, हे पाहून अनेक नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. मुख्य म्हणजे भारतीयांनी या कलाकाराचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

अली खानने काजोलसोबत ‘द ट्रायल’ या वेब सिरीजमध्ये काम केलं होतं. याशिवाय त्याने ‘लक बाय चान्स’, ‘डॉन २’ आणि ‘द आर्चीज’ सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. दरम्यान हा अलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. पाकिस्तानी अभिनेता असूनही त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर भारतीय प्रेक्षकांमध्येही स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

आम्हाला मुंबईत येऊन मंत्र्‍यांची घरं बघायची आहेत - मनोज जरांगे पाटील
आम्हाला मुंबईत येऊन मंत्र्‍यांची घरं बघायची आहेत - मनोज जरांगे पाटील.
क्लस्टर डेव्हलपमेंट अंतर्गत जुन्या इमारतींचा पुनर्विकास- एकनाथ शिंदे
क्लस्टर डेव्हलपमेंट अंतर्गत जुन्या इमारतींचा पुनर्विकास- एकनाथ शिंदे.
'त्यांनी केले ते प्रेम आम्ही केला तर बलात्कार', काय म्हणाले राज ठाकरे
'त्यांनी केले ते प्रेम आम्ही केला तर बलात्कार', काय म्हणाले राज ठाकरे.
'माझ्या डोक्यावर तलवारी घेऊन नाही मी फिरत..,' काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्या डोक्यावर तलवारी घेऊन नाही मी फिरत..,' काय म्हणाले राज ठाकरे.
'लग्नात भेटल्याने युती होईल...हा,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'लग्नात भेटल्याने युती होईल...हा,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
टकल्या लोकांच्या डोक्यावर पुन्हा केस पण आता 'या' नव्या आजारानं ग्रासलं
टकल्या लोकांच्या डोक्यावर पुन्हा केस पण आता 'या' नव्या आजारानं ग्रासलं.
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, राणेंची मागणी अन् शिक्षणमंत्र्यांना पत्र
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, राणेंची मागणी अन् शिक्षणमंत्र्यांना पत्र.
'तृप्तीताई शांत रहा, धर्मात लुडबुड नको', तृप्ती देसाईंना कोणाचा सल्ला?
'तृप्तीताई शांत रहा, धर्मात लुडबुड नको', तृप्ती देसाईंना कोणाचा सल्ला?.
'जरा थांब, घाई कशाला...'; पालकमंत्रिपदावर गोगावलेंचं मिश्किल उत्तर
'जरा थांब, घाई कशाला...'; पालकमंत्रिपदावर गोगावलेंचं मिश्किल उत्तर.
पुण्यात एकाच दिवसात ७ जणांनी आयुष्य संपवलं; टोकाचा निर्णय घेत...
पुण्यात एकाच दिवसात ७ जणांनी आयुष्य संपवलं; टोकाचा निर्णय घेत....