सैफच्या लेकासह डेटिंगच्या चर्चा ! श्वेता तिवारीच्या लेकीने पाकिस्तानसाठी जे केलं… नेटीजन्सचा उडाला भडका…
टीव्हीवरची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी ही तिच्या सौंदर्य आणि फिटनेससाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. तिची मुलगी पलकही तितकीच प्रसिद्ध आहे. लोक अनेकदा श्वेता आणि पलकला बहिणीच समजतात. पलक तिवारीचेही मोठं फॅन फॉलोइंग आहे. पलक तिच्या प्रोफेशनल आयुष्याप्रमाणेच पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असते.
मुंबई | 21 फेब्रुवारी 2024 : टीव्हीवरची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी ही तिच्या सौंदर्य आणि फिटनेससाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. तिची मुलगी पलकही तितकीच प्रसिद्ध आहे. लोक अनेकदा श्वेता आणि पलकला बहिणीच समजतात. पलक तिवारीचेही मोठं फॅन फॉलोइंग आहे. पलक तिच्या प्रोफेशनल आयुष्याप्रमाणेच पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असते, अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम आणि पलक एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहेत. त्यातच आता पलक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण त्यामागचं कारण जाणून तुम्हीही आश्चर्चकित व्हाल.
खरंतर, तिच्या आईप्रमाणेच पलक तिवारीसुद्धा अनेकदा चाहत्यांसाठी सुंदर फोटो शेअर करत असते. प्रत्येक वेळी तिला चाहत्यांकडून भरभरून दाद मिळते. पण यावेळी पलकने असं काही केले की तिचे कौतुक होण्याऐवजी तिला ट्रोलिंगची शिकार व्हावे लागले. खरं तर, ट्रोलिंगच नव्हे तर युजर्स पलकवर चांगलेच चिडलेले दिसले. त्याचं कारण म्हणजे पलक तिवारीने केलेलं एक शूट.. पलकने नुकतंच एथनिक वेअरमध्ये शूट केले आहे. त्या ड्रेसमध्ये पलक खूपच सुंदर दिसत होती. तिने पंजाबी ड्रेस घातला होता, आणि मिनिमल मेकअपही. पण त्यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. तिचे हे फोटो फैजा सकलेन हिने शेअर केले, जी पाकिस्तामधील एक प्रसिद्ध डिझायनर आहे.
View this post on Instagram
पलकवर संतापले यूजर्स
पण बघता-बघात हे फोटो व्हायरला झाले आणि पलकच्या या फोटोंवर यूजर्स नाराज झाले. आणि फक्त भारतातच नाही तर पाकिस्तानातही लोक तिला शिव्या देऊ लागले. खरंतर , पाकिस्तानी युजर्स त्या डिझायरनवरच रागावले. पाकिस्तानमध्ये अनेक सुंदर मुली आहेत, तिने शूटिंगसाठी पलकची निवड का केली ? असा सवाल यूजर्सनी त्या डिझायनरला विचारला. तर भारतीय यूजर्स पलकवर संतापले. पलकला पाकिस्तानी डिझायनरसाठी काम करण्याची काय गरज होती, असा सवाल अनेकांनी तिला विचारला. हे पूर्णपणे चुकीचे आहे. पाकिस्तानसाठी कोणतही काम कशाला केलं, काय गरज होती ? असा सवाल यूजर्सनी विचारला. तर तिकडे पाकिस्तानी लोक ही भडकले. पाकिस्तानी कलाकारांना भारतात संधी दिली जात नाही, तर मग भारतीय कलाकारांना पाकिस्तानमध्ये जागा कशासाठी ? असा सवाल त्यांनी विचारला. पाकिस्तानमध्ये दुसरी कोणी अभिनेत्री किंवा मॉडेल नव्हती का, की हिला भारतातून घेऊन आलात ? तसंही ती फार सुंदर नाही, अशा शब्दांत युजर्सनी पलकला फटकारलं.