मला चुकीचा सल्ला दिला.. प्रियांका चोप्रासारखी बहीण असतानाही एकटी पडली परिणीती, अनेक वर्षानंतर मनातील सल ओठांवर..

'अमर सिंह चमकीला' हा चित्रपट नुकताच रिलीज झाला असून त्यामुळे परिणीती चोप्रा खूप चर्चेत आहे. या चित्रपटात तिने चमकिला यांच्या दुसऱ्या पत्नीची अमरजोतची भूमिका साकारली. परिणीतीच्या आवाजाचेच नाही तर तिच्या अभिनयाचेही खूप कौतुक होत आहे. मात्र याच दरम्यान ती तिच्या ढासळत्या करिअरबद्दल व्यक्त झाली.

मला चुकीचा सल्ला दिला.. प्रियांका चोप्रासारखी बहीण असतानाही एकटी पडली परिणीती, अनेक वर्षानंतर मनातील सल ओठांवर..
Follow us
| Updated on: Apr 18, 2024 | 10:03 AM

अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या ‘अमर सिंह चमकीला’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 12 एप्रिल रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून त्यामध्ये दिलजीत दोसांझ आणि परिणीती मुख्य भूमिकेत आहेत. दिलजीत दोसांझ हा चमकिलाच्या भूमिकेत चमकला, तर परिणीती चोप्रा हिने चमकिला यांच्या दुसऱ्या पत्नीची अमरजोतची भूमिका साकारली. तिच्या कामाचे, अभिनयाचेही खूप कौतुक होत आहे. या चित्रपटासाठी परिणीतीने बरीच मेहनत घेतली, तिने तिचे वजनही 15 किलोने वाढवले. चित्रपटाबद्दल अनेक किस्से तिने शेअर केले.

मात्र याचदरम्यान परिणीती तिच्या करिअरबद्दलही बोलली. 2012 साली परिणीतीने इश्कजादे चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. या चित्रपटात अर्जुन कपूरची देखील मुख्य भूमिका होती. 12 वर्षांच्या करिअरमध्ये परिणीतीने 8 फ्लॉप चित्रपट दिले. त्यावरही ती मोकळेपणे व्यक्त झाली.

परिणीतीला कोणी दिला चुकीचा सल्ला ?

परिणीतीने नुकतेच काही इंटरव्ह्यू दिले, त्यावेळी तिच्या आधीच्या चित्रपटांबद्दलही बोलली. अनेकांनी मला चुकीचे सल्ले दिल्याचे परिणीतीने सांगितलं.  त्यांचं ऐकून मी अनेक चित्रपट केले, जे मला त्यावेळी योग्य वाटले किंवा फायदेशीर होते असं वाटलं. पण, त्यावेळी मला स्वत:ला या इंडस्ट्रीची फारशी कल्पना नव्हती. त्यामुळे माझ्या कारकिर्दीत अनेक चुका झाल्या आणि त्याचेच परिणाम आज मला भोगावे लागत आहेत, असं परिणीतीने नमूद केलं.

मात्र लोकांच्या चुकीच्या सल्ल्याचे पालन केल्याबद्दल परिणीतीने स्वतःलाच दोषी ठरवलं. त्यावेळी मी माझ्या बोलण्यावर ठाम राहिले असते आणि माझा आतला (मनाचा) आवाज ऐकला असता तर कदाचित माझ्या करिअरमध्ये कमी चुका झाल्या असत्या, असं ती म्हणाली. पण त्यावेळी माझ्या आजूबाजूला असे अनेक लोक होतं, ज्यांनी मला (त्यावेळच्या) ट्रेंड्सनुसार, चित्रपट निवडण्यास सांगितलं. माझ्या फॅशन चॉईसवरही त्यांचा खूप प्रभाव होता. मला या इंडस्ट्रीबद्दल पुरेशी माहिती असती, तर मला त्या लोकांचे ऐकण्याची गरज पडली नसती, असं म्हणत परिणीतीने तिच्या ढासळत्या करिअरला कारणीभूत ठरलेल्या लोकांवर निशाणा साधला.

पुढचा प्लान काय ?

पण आता पुढ काय करायचं आहे हे मला समजलं आहे. जे काम देतील अशा दिग्दर्शकांची आणि प्रोड्यूसर्सची मला गरज आहे. माझ्या आधीच्या चुका पाहून नव्हे तर माझं काम, टॅलेंच पाहून मला काम मिळेल अशी परिणीतीला आशा आहे. मात्र, परिणीतीचं हे बोलणं ऐकल्यानंतर चाहत्यांकडून धक्कादायक प्रतिक्रिया येत आहेत. प्रियांका चोप्रा सारखी बहीण दीर्घकाळापासून इंडस्ट्रीत असूनही परिणीती चोप्राला समजावणंर कोणी नव्हतं, यावर फॅन्सचा विश्वास बसत नाहीये. प्रियांकाने तिच्या बहिणीला मार्गदर्शन केलं नाही का, ती तिच्या बहीणीला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित नव्हती का, अशी चर्चा यामुळे चाहते करत आहेत.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.