Bollywood | परिणीती चोप्रा हिच्याआधी ‘या’ अभिनेत्रींनी राजकारणी व्यक्तींसोबत बांधली लग्नगाठ

| Updated on: Sep 22, 2023 | 11:02 AM

Bollywood | बॉलिवूडला राम राम ठोकत 'या' अभिनेत्रींनी राजकारणी व्यक्तींसोबत बांधली लग्नगाठ... आता परिणीती चोप्रा लवकरच होणार राघव चड्ढा यांची पत्नी... परिणीती चोप्रा हिच्यामुळे अन्य अभिनेत्री देखील आल्या चर्चेत, ज्यांनी केलं राजकारणी व्यक्तीसोबत लग्न...

Bollywood | परिणीती चोप्रा हिच्याआधी या अभिनेत्रींनी राजकारणी व्यक्तींसोबत बांधली लग्नगाठ
Follow us on

मुंबई : 22 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री लवकरच AAP नेता राघव चड्ढा यांच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. २४ सप्टेंबर रोजी परिणीती आणि राघव यांचा शाही थाटात लग्नसोहळा पार पडणार आहे. सध्या त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. उदयपूर याठिकाणी परिणीती आणि राघव लग्नबंधनात अडकणार आहेत. पण परिणीती हिच्यापूर्वी अनेक अभिनेत्रींनी झगमगत्या विश्वाचा निरोप घेत राजकारणी व्यक्तींसोबत लग्न केलं. सध्या सर्वत्र बॉलिवूड अभिनेत्रींची चर्चा रंगली आहे. ज्यांनी राजकारणी व्यक्तींसोबत लग्न केलं.

अभिनेत्री स्वरा भास्कर – स्वरा हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. काही दिवसांपूर्वी स्वरा भास्कर हिने समाजवादी पार्टीचे नेते फाहद अहमद यांच्यासोबत लग्न केलं. अभिनेत्री लवकरच पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. सध्या स्वरा तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे.

अभिनेत्री आयेशा टाकिया – ‘वॉन्टेड’ फेम अभिनेत्री आयेशा टाकिया हिने देखील अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण अभिनेता सलमान खान याच्यासोबत स्क्रिन शेअर केल्यामुळे आयेशा हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. पण आता अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आनंदी वैवाहिक आयु्ष्य जगत आहे. २००९ मध्ये अभिनेत्रीने समाजवादी पार्टीचे नेते एमअलए फरहान आझमी यांच्यासोबत लग्न केलं. आयेशा आता दोन मुलांची आई आहे.

हेमा मालिनी – धर्मेंद्र – यांनी दोघांनी लग्नाच्या अनेक वर्षांनी राजकारणात प्रवेश केला. १९८० मध्ये हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी लग्न केलं. दोघांची लव्हस्टोरी कायम चर्चेत राहिली. आता देखील हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसमोर येत असतात.

जया बच्चन – झगमगत्या विश्वात एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त जया बच्चन यांच्या नावाचा बोलबाला होता. लग्नानंतर देखील जया बच्चन अनेक सिनेमांमध्ये झळकल्या. पण लग्नाच्या अनेक वर्षांनी जया बच्चन यांनी राजकारणात प्रवेश केला. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेलं नातं आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतं…