Parineeti Chopra | ‘सायना’गर्ल परिणीती चोप्राचा ‘टॉपलेस’ अवतार, बोल्ड लूक पाहून चाहते म्हणतायत…

नुकताच परिणीती चोप्राचा ‘सायना’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने जास्त कमाई केली नसली, तरी या चित्रपटातील परिणीतीच्या अभिनयाचे चाहत्यांनी कौतुक केले आहे.

Parineeti Chopra | ‘सायना’गर्ल परिणीती चोप्राचा ‘टॉपलेस’ अवतार, बोल्ड लूक पाहून चाहते म्हणतायत...
परिणीती चोप्रा
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 12:17 PM

मुंबई : छायाचित्रकार डब्बू रत्नानी (Dabboo Ratnani) यांचे फोटो केवळ देशातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आहेत. प्रत्येक वर्षी सर्वांनाच या फोटोग्राफरच्या कॅलेंडरची प्रतीक्षा असते. डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरमध्ये अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone), कृती सेनॉन (Kriti Sanon)पासून ते कियारा अडवाणीपर्यंत सगळ्या अभिनेत्रींनी टॉपलेस फोटोशूट केले आहे. या सर्व अभिनेत्रींचे फोटो प्रदर्शित झाले, तेव्हा ते पाहून चाहते देखील घायाळ झाले होते. आता ‘सायना’ गर्ल अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) हिचेही नाव या यादीमध्ये समाविष्ट झाले आहे (Parineeti Chopra Topless Photoshoot for Dabboo Ratnani calendar).

नुकताच परिणीती चोप्राचा ‘सायना’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने जास्त कमाई केली नसली, तरी या चित्रपटातील परिणीतीच्या अभिनयाचे चाहत्यांनी कौतुक केले आहे. यादरम्यान, परिणीती चोप्रा चक्क टॉपलेस झाली आहे. तिच्या या हॉट फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

डब्बूच्या कॅलेंडरसाठी परिणीती टॉपलेस

फोटोग्राफार डब्बू रत्नानी यांनी परिणीती चोप्राच्या या बोल्ड लूकचा फोटो इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. परिणीती या फोटोमध्ये टॉपलेस दिसत आहे. या फोटोमध्ये परिणीती चोप्रा एका समान वाहून नेण्याच्या हातगाडीमध्ये बसलेली असून, ती टॉपलेस दिसत आहे. खरं तर, या फोटोमध्ये परिणीती चोप्राचे केवळ खांदे व पायच दिसत आहेत. तिचा हा बोल्ड लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. काहींनी परिणीतीचे कौतुक केले, तर काहींनी ‘गाडीवाला आया घरसे कचरा निकाल…’ असे म्हणत ट्रोल केले आहे.

पाहा परिणीतीचा लूक

परिणीतीचा हा फोटो शेअर करताना डब्बूने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हीच युवर वॅगन टू अ स्टार’. यासह परिणीतीचा हा बोल्ड लुक पाहून चाहत्यांनी अभिनेत्रीचे कौतुक केले आहे. यावेळी डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरमध्ये त्याने आणखी कोणाकोणाला स्थान दिले आहे, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे (Parineeti Chopra Topless Photoshoot for Dabboo Ratnani calendar).

‘या’ अभिनेत्रींनीही केले टॉपलेस शूट!

यापूर्वी गेल्यावर्षीच्या अर्थात 2020च्या कॅलेंडरमध्ये अभिनेत्री कियारा अडवाणी टॉपलेस लूकमध्ये दिसली होती. त्या फोटोशूटमध्ये कियारा टॉपलेस अंदाजात एका मोठ्या पानाच्या मागे उभी होती. मात्र, त्यानंतर अभिनेत्रीला जोरदार ट्रोल केले गेले होते. यापूर्वी सनी लिओनी 2019कॅलेंडरच्या फोटोशूटमध्ये टॉपलेस झाली होती, त्याशिवाय भूमी पेडणेकर आणि श्रद्धा कपूरनेही या कॅलेंडरसाठी टॉपलेस फोटोशूट केले आहे.

बॉडी शेमिंगवर व्यक्त झाली परिणीती

अलीकडेच परिणीती चोप्राने बॉडी शेमिंगवर वक्तव्य केले होते. यावेळी तिने सांगितले की, करिअरच्या सुरूवातीला वाढलेल्या वजनामुळे तिला बऱ्याच टीकेचा सामना करावा लागला होता. बॉडी शेमिंग ही पृथ्वीवरील सर्वात हास्यास्पद गोष्ट आहे. प्रत्येकाने तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मुद्दामहून बारीक होण्याचा प्रयत्न करू नये.

(Parineeti Chopra Topless Photoshoot for Dabboo Ratnani calendar)

हेही वाचा :

Kirron Kher | बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर यांना रक्ताचा कर्करोग, मुंबईत उपचार

Bappi Lahiri Corona | सुप्रसिद्ध गायक-संगीतकार बप्पी लहरींना कोरोनाची लागण, मुंबईतील रुग्णालयात दाखल

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.