TMKOC | ‘पत्रकार पोपटलाल’ प्रत्यक्षात कोट्यावधींचे मालक, प्रत्येक भागासाठी आकारतात ‘इतके’ मानधन!

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टीव्ही कार्यक्रमात ‘पत्रकारा’ची भूमिका साकारणारे श्याम पाठक खऱ्या आयुष्यात विवाहित असून, तीन मुलांचे पिता आहेत.

TMKOC | ‘पत्रकार पोपटलाल’ प्रत्यक्षात कोट्यावधींचे मालक, प्रत्येक भागासाठी आकारतात ‘इतके’ मानधन!
Follow us
| Updated on: Jan 20, 2021 | 2:59 PM

मुंबई :तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehtaka ooltah Chashmah) या लोकप्रिय मालिकेमध्ये ‘पत्रकार पोपटलाल’ (Patrakar Popatlal) ही भूमिका साकारणारे श्याम पाठक (Shyam Pathak) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या मालिकेत सध्या पत्रकार पोपटलालच्या लग्नाचा ट्रॅक सुरु आहे. वर्षानुवर्षे आपल्या लग्नाचे स्वप्न पाहणारा पत्रकार पोपटलाल लवकरच लग्न करेल, असे चाहत्यांनाही वाटत होते. मात्र, पुन्हा एकदा हा ‘लग्न’ फुगा फुटला आहे. मालिकेत लग्न होण्याची वाट बघणारा ‘कंजूस’ पोपटलाल खऱ्या आयुष्यात मात्र, कोट्यावधींचा मालक आहे (Patrakar Popatlal AKA actor Shyam Pathak charges for per episode).

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टीव्ही कार्यक्रमात ‘पत्रकारा’ची भूमिका साकारणारे श्याम पाठक खऱ्या आयुष्यात विवाहित असून, तीन मुलांचे पिता आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्याकडे जवळपास 15 कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेते श्याम पाठक यांना ‘तारक मेहता…’ या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडसाठी सुमारे 60 हजार रुपये इतके मानधन दिले जाते.

‘तारक मेहता…’ आधीही मालिका

अभिनेते श्याम पाठक यांनी प्रसिद्ध ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेपूर्वी ते ‘जसुबेन जयंती लाल जोशी की जॉइंट फॅमिली’ या मालिकेमध्येही दिसले होते. माध्यमांच्या रिपोर्टनुसार, श्याम पाठक यांच्याकडे स्वत:ची मर्सिडीज कार आहे. याशिवाय त्यांच्याकडेही कोट्यवधींची संपत्ती देखील आहे (Patrakar Popatlal AKA actor Shyam Pathak charges for per episode).

अभिनयाच्या वेडापायी ‘चार्टर्ड अकाऊंटंट’चा अभ्यासक्रम सोडला!

श्याम पाठक यांना ‘चार्टर्ड अकाऊंटंट’ व्हायचे होते. पण, अभिनयात रस असल्यामुळे त्यांनी ‘चार्टर्ड अकाऊंटंट’चा अभ्यासक्रम अर्धवट सोडला. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ येथेच श्याम पाठक यांची भेट रेश्मी यांच्याशी झाली. हळूहळू श्याम आणि रेश्मीची मैत्री प्रेमात बदलली. त्यांनी लग्न केले असून, श्याम आणि रेशमी यांना तीन मुले आहेत. मुलीचे नाव नियती आणि मोठ्या मुलाचे नाव पार्थ आहे. तर त्यांच्या धाकट्या मुलाचे नाव शिवम आहे.

‘जेठालाल’ आकारतात सर्वाधिक मानधन

‘जेठालाल’ या पात्राशिवाय ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेची कल्पनाही करता येणार नाही. हे पात्र मालिकेत खूप महत्त्वाचे आहे. एरव्ही अगदी हसतमुख असणारे ‘जेठालाल’ सतत कुठल्यातरी समस्येत अडकत असतात. परंतु, जेठालालच्या जीवनातील याच समस्या सर्व रसिक प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद घेऊन येतात. म्हणूनच ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता दिलीप जोशी यांना सर्वाधिक मानधन दिले जाते. या मालिकेच्या एका भागासाठी त्यांना तब्बल दीड लाख रुपये मानधन दिले जातात.

(Patrakar Popatlal AKA actor Shyam Pathak charges for per episode)

हेही वाचा :

जेठालाल उर्फ ​​दिलीप जोशीला नवीन ऑफर्स, ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिका सोडणार?

Photo : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील महिला मंडळींचा ग्लॅमरस अंदाज

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.