Paurashpur | फिटनेस फ्रीक मिलिंद सोमणचा किलींग लूक, तुम्ही पाहिलात का?
अभिनेता मिलिंद सोमण याचा या वेबसीरीजमध्ये अनोखा लूक पाहायला मिळत आहे. (Paurashpur web series Milind Soman New Look)
मुंबई : बॉलिवूड चित्रपट निर्माती एकता कपूरच्या अल्ट बालाजी वेबसीरीज अॅपचा महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित ‘पौरषपूर’चा टीझर नुकतंच प्रदर्शित करण्यात आला. या वेबसीरीजमध्ये झळकणाऱ्या सर्वच कलाकार एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. अभिनेता मिलिंद सोमण याचा या वेबसीरीजमध्ये अनोखा लूक पाहायला मिळत आहे. यामुळे मिलिंद सोमणच्या चाहत्यांसाठी ही वेबसीरीज अनोखी पर्वणी ठरत आहे. (Paurashpur web series Milind Soman New Look)
‘पौरषपूर’ या वेबसीरिजसाठी मिलिंद सोमणने नाकात नथ, धोतर, कपाळाला कुंकू, लांब केस, हातात तलावर असा किलिंग लूक परिधान केला आहे. त्याच्या या लूकवर त्याचे चाहते फिदा झाले आहेत. मिलिंद सोमणने या वेबसीरीजमध्ये बोरीस नावाचे पात्र साकारले आहे. बोरीस हे पात्र तृतीयपंथी असल्याचे दाखवण्यात आलं आहे. तर अभिनेत्री शिल्पा शिंदे ही राणी मीरावतीचे पात्र साकारत आहे.
A kingdom where to love is to go to war! Witness love, lust, betrayal and the ultimate clash for gender equality. #Paurashpur awaits its revolution! Trailer out on 8th Dec, 12 pm on #ALTBalaji@ektarkapoor @milindrunning @annukapoor_ #ShilpaShinde @SalathiaSahil #AnantJoshi pic.twitter.com/uiOO9uUhmI
— ALTBalaji (@altbalaji) December 6, 2020
‘पौरषपूर’ ही वेबसीरीज पुरुषी मक्तेदारीविरोधात, महिलांना मिळणारी असमान वागणूक यावर आधारित आहे. भव्यदिव्य सेट, सत्तेसाठी होणारी लढाई, वासना, रक्ताने लाल झालेल्या तलावारी, प्रभावशाली संवाद, पुरुष आणि महिलांमधील असमानता असे अनेक पैलू या सीरीजमधून उलगडणार असल्याचे दिसत आहे. पौरषपूर या वेब सीरीजचे कथानक पुरुषप्रधान संस्कृतीवर आधारित आहे.
The kingdom bows down to King Bhadrapratap; the merciless ruler of Paurashpur. His spoken words, his actions & his decisions dare not be questioned. Witness the saga of betrayals & the battle of the sexes only in #Paurashpur! Teaser out on 6th Dec @ektarkapoor @annukapoor_ pic.twitter.com/XK0rjofvJj
— ALTBalaji (@altbalaji) December 4, 2020
या सीरीजचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे आता अनेक चाहत्यांना ट्रेलर कधी येणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर 8 डिसेंबरला प्रदर्शित करण्यात येणार आहे.
Strong & confident, Veer is the vyapari who has entered Paurashpur. He has a past that haunts his present! Can this vyapari be the change that Paurashpur needs? This epic story & a wave of revolution in #Paurashpur is coming soon. Teaser out on 6th Dec. @ektarkapoor @Shaheer_S pic.twitter.com/UcFsGqw4n5
— ALTBalaji (@altbalaji) December 4, 2020
पौरषपूर या वेब सीरीजमध्ये मिलिंद सोमणसोबतच अभिनेत्री शिल्पा शिंदे (राणी मीरावती), शाहीर शेख (वीर सिंह), साहिल सलाथिया (भानू), अन्नू कपूर (राजा भद्रप्रताप), पोलोमी दास (काला), आदित्य लाल (राजकुमार रणवीर) आणि अनंत विजय जोशी (राजकुमार आदित्य) हे कलाकार दिसणार आहेत. (Paurashpur web series Milind Soman New Look)
संबंधित बातम्या :
‘सीताहरणवर’ रावण vs भाजपा! सैफवर का भडका?
वर्कआऊट कसं करावं, कतरिना कैफचे धडे, सोशल मीडियावर वर्कआऊट रुटीन शेअर