‘त्या’ गोष्टीसाठी तयार झाले असते तर माझे 30 चित्रपट झाले असते, अनुराग कश्यपवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीचे वादग्रस्त विधान
दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचे तसेच बळजबरी केल्याचे गंभीर आरोप करणारी अभिनेत्री पायल घोष आता एका नव्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. सिनेसृष्टीबद्दल धक्कादायक वक्तव्य करणापी ही पोस्ट तिने शेअर करून लगेच डिलीटही केले. काय म्हणाली ती जाणून घेऊया...
Payal Ghosh Cryptic Post : सिनेसृष्टीचा झगमगाट, तिथलं ग्लॅमर हे भल्याभल्यांना मोहात पाडतं, पण हे जग आतून कसं आहे याच सत्यही बऱ्याच वेळा उघड होतं. कास्टिंग काऊच हे इंडस्ट्रीचं ते काळं सत्य आहे, ज्याचा अनेकांना सामना करावा लागला आहे. त्याबद्दल बरेच जण उघडपणे बोललेही आहेत. आता एक आघाडीची अभिनेत्रीही या विषयावर बोलली असून तिने तिचं मत मांडलं आहे. पायल घोषने (payal ghosh) नुकतीच एक पोस्ट शेअर केली अन् ती लगेच डिलीटही केली. मात्र त्यातील तिच्या शॉकिंग (shocking statement) वक्तव्यांमुळे खळबळ उडाली आहे.
तीन वर्षांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर लैंगिक शोषण आणि जबरदस्ती केल्याचा आरोप लावणाऱ्या पायलने नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. जास्त चित्रपट हवे असतील तर तुम्हाला (सोबत) झोपावे लागेल.
पायलने नुकतीच तिच्या 11व्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यानिमित्ताने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने एक वाक्य लिहीलं होतं. ‘फायर ऑफ लव्ह : रेड’ यासह मी माझा 11 वा चित्रपट पूर्ण करणार आहे. जर मी (कोणासोबत) झोपले असते, तर आज मी माझा 30 वा चित्रपट पूर्ण केला असता, असे तिने म्हटले आहे. ‘मोठ्या चित्रपटात काम मिळवण्यासाठी तुम्हाला कुणासोबत तरी झोपावे लागते, झोपल्याशिवाय हे शक्य नाही’, असेही तिने तिच्या पोस्टमध्ये लिहीले होते.
View this post on Instagram
पायलने ही पोस्ट शेअर करताच त्यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आणि खळबळही माजली. मात्र यावरील वाद जास्त वाढण्यापूर्वीच पायलने तिची पोस्ट डिलीट केली. तिच्या या पोस्टवर विविध कमेंट्स येत असून पायलही कास्टिंग काऊचची शिकार झाली असल्याचा आणि तिला बरेच चित्रपट गमवावे लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तिच्या या पोस्टनंतर अनेक लोक तिच्यावर टीका करत आहेत तर काही असेही आहेत, जे तिला सपोर्टही करत आहेत. 2020 मध्ये पायलने दिग्दर्शक अनुराग कश्यपवरही गंभीर आरोप केले होते. सोशल मीडियावरही ती खूप ॲक्टिव्ह असते.