मुंबई : उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. मुळात म्हणजे उर्फी जावेद (Uorfi Javed) ही कधी काय घालेल हे सांगणे कठीण आहे. उर्फी जावेद ही अनेकदा तिच्या कपड्यामुळे मोठ्या वादात सापडते. लोक उर्फी जावेद हिच्यावर तिच्या कपड्यांमुळे जोरदार टिका करताना दिसतात. इतकेच नाही तर उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण बघायला मिळतंय. मात्र, असे असतानाही उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर (Social media) जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये.
उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये अत्यंत मोठा खुलासा केला. उर्फी जावेद ही म्हणाली की, पाॅर्न साईटवर तिचे काही फोटो अपलोड झाले होते. मात्र, त्याबद्दल तिलाही काहीही कल्पना नव्हती. मात्र, ज्यावेळी हे तिच्या वडिलांना समजले त्यावेळी त्यांनी तिला काही घंटे मारहाण केली. इतकेच नाही तर ती बेशुद्ध देखील झाली.
उर्फी जावेद हिचा नवा अतरंगी लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. उर्फी जावेद हिचा हा लूक पाहून अनेकजण हे हैराण झाल्याचे देखील बघायला मिळत आहे. उर्फी जावेद हिला पाहून काही वेळ पापाराझी देखील चक्रावले. उर्फी जावेद ही यावेळी एकदम अतरंगी लूकमध्ये दिसत आहे. याचेच व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.
या नव्या लूकमध्ये उर्फी जावेद हिने आपले संपूर्ण अंग हे काळ्या कपड्याने झाकले आहे. काही काळा कपडा आहे तर काही काळा जाळीवाला कपडा आहे. इतकेच नाही तर उर्फी जावेद हिने आपला चेहराही काळ्या रंगाच्या कपड्याने झाकला आहे. या लूकचे सर्वाधिक लक्ष हे पँटकडे केंद्रित होत आहे. या लूकवर उर्फी जावेद हिने एक अत्यंत मोठी पँट घातल्याचे दिसत आहे.
आता उर्फी जावेद हिच्या या लूकच्या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एकाने लिहिले की, उड जा काले कांवा. दुसऱ्याने लिहिले की, अरे हे काय नवीन उर्फी, तिसऱ्याने लिहिले की, चला चांगली गोष्ट आहे, यावेळी किमान संपूर्ण अंग तरी झाकले आहे. या व्हिडीओनंतर युजर्स हे सोशल मीडियावर उर्फी जावेद हिची खिल्ली उडवताना दिसत आहेत.
उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ चांगलचा व्हायरल होतोय. उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच चक्क शर्ट न घालताना एक फोटोशूट केले होते. या फोटोमध्ये उर्फी जावेद हिच्या हातामध्ये फक्त नाश्त्याच्या प्लेट या दिसत होत्या. उर्फी जावेद हिचे ते फोटो पाहून लोकांना मोठा धक्का बसला होता. उर्फी जावेद नेहमीच तिच्या कपड्यांमुळे वादात अडकते.