Planet Marathi : ‘प्लॅनेट मराठी’च्या ऑफिसचा शुभारंभ, कार्यक्रमाला दिग्गजांची हजेरी

'प्लॅनेट मराठी'च्या कार्यालयाचा भव्य शुभारंभ सोहळा दिमाखात साजरा करण्यात आला. (Planet Marathi: Launch of 'Planet Marathi's office)

Planet Marathi :  'प्लॅनेट मराठी'च्या ऑफिसचा शुभारंभ, कार्यक्रमाला दिग्गजांची हजेरी
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 4:12 PM

मुंबई : जगभरातील मराठमोळ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याच्या आणि आपली मराठी कलाकृती, संस्कृती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं काही महिन्यांपूर्वी ‘प्लॅनेट मराठी’ या पहिल्या वहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा करण्यात आली होती. खरंतर प्रेक्षकांमध्ये तेव्हापासून ‘प्लॅनेट मराठी’ विषयी उत्सुकता होती. अखेर या उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला आहे. आता ‘प्लॅनेट मराठी’च्या कार्यालयाचा भव्य शुभारंभ सोहळा दिमाखात साजरा करण्यात आला. त्यामुळे आता लवकरच ‘प्लॅनेट मराठी’ प्रेक्षकांच्या भेटीस दाखल होणार आहे.

या सोहळ्याला सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेते सचिन पिळगावकर, मृणाल कुलकर्णी, अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित, स्वप्नील जोशी, श्रुती मराठे, सायली संजीव, गायत्री दातार, गौरव घाटणेकर, नेहा पेंडसे,  मनवा नाईक, स्वप्ना वाघमारे- जोशी, सोनाली खरे, आदिनाथ कोठारे, सुव्रत जोशी, शिवानी बावकर, आरोह वेलणकर, सुभाष देसाई, स्वप्नील गोडबोले, अमित फाळके आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीपासूनच ‘प्लॅनेट मराठी’सोबत अनेक मोठी नावे जोडली गेली आहेत. मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज अमित भंडारी,  ऑस्कर ज्युरी उज्वल निरगुडकर, इतकेच नाही सिंगापूरमधील व्हिस्टास मीडिया कॅपिटल या मनोरंजन कंपनीनेही ‘प्लॅनेट मराठी’सोबत काम करण्याची तयारी दाखवली आहे. पुष्कर श्रोत्री आणि आदित्य ओक यांची भागीदारी असणाऱ्या या ‘प्लॅनेट मराठी’चे सर्वेसर्वा अक्षय बर्दापूरकर आहेत. आपल्या या संकल्पनेविषयी अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”देशातील तसेच परदेशातील मराठी प्रेक्षक ‘मराठी चित्रपटांच्या ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’चा अनुभव घरबसल्या घेऊ शकतील. मराठी आशयाला योग्य स्थान मिळवून देण्यासाठी ‘प्लॅनेट मराठी’चा कायम प्रयत्न असेल. आज आमच्या या कुटुंबात अनेक दिग्गज आहेत, ज्यांच्यामुळे आमचे हे कुटुंब अधिक सक्षम होईल आणि त्यांच्या मदतीने आम्ही उत्कृष्ट असा आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू.”

संबंधित बातम्या 

Photo : ‘प्लॅनेट मराठी’च्या कार्यालयाचा भव्य शुभारंभ सोहळा, पाहा फोटो

Marathi Movie : ‘अदृश्य’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात, झळकणार मंजरी फडणीस आणि पुष्कर जोग यांची जोडी

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.