Aditya Narayan | आदित्य नारायणच्या विवाहसोहळ्यात अनुपस्थिती, पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडून नवदाम्पत्याला शुभेच्छा!

कोरोना परिस्थिती आणि इतर कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी या विवाहसोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत. मात्र, त्यांनी एका पत्राद्वारे या नव दाम्पत्याला नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.

Aditya Narayan | आदित्य नारायणच्या विवाहसोहळ्यात अनुपस्थिती, पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडून नवदाम्पत्याला शुभेच्छा!
Follow us
| Updated on: Dec 03, 2020 | 12:25 PM

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक-अभिनेता आदित्य नारायण (Aditya Narayan) 1 डिसेंबरला मैत्रीण श्वेता अग्रवालसोबत (Shweta Agarwal) विवाहबंधनात अडकला आहे. कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत आदित्य-श्वेताने सात फेरे घेतले. यानंतर 2 डिसेंबर रोजी आदित्य आणि श्वेताच्या रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या मुलाच्या लग्नानंतर आदित्य नारायणचे वडील अर्थात प्रसिद्ध गायक उदित नारायण यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. उदित नारायण यांनी बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांना आणि मंत्र्यांना आपल्या मुलाच्या लग्नासाठी आमंत्रित केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही (PM Narendra Modi) या विवाह सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले होते (PM Narendra Modi sent best wishes to Aditya Narayan and Shweta Agarwal).

मात्र, कोरोना परिस्थिती आणि इतर कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी या विवाहसोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत. मात्र, त्यांनी एका पत्राद्वारे या नव दाम्पत्याला नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे. या संदर्भात आदित्यचे वडील, उदित नारायण यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

दिग्गजांच्या शुभेच्छा

उदित नारायण यांच्याशी एका वृत्तपत्राने यासंदर्भात खास संवाद साधला. यावेळी उदित नारायण यांनी दिलखुलास प्रतिक्रिया दिल्या. उदित म्हणतात, “कोरोनाच्या प्रसारामुळे बरेच लोक लग्नाला येऊ शकले नाहीत. मात्र, त्या सगळ्यांनी त्यांच्या शुभेच्छा पाठवल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शुभेच्छा पत्र मिळणे ही आनंदाची बाब आहे. या पत्रात त्यांनी आदित्यला त्याच्या नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन यांच्याकडून शुभेच्छा पत्रही आले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील फोनवरून शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही आदित्य-श्वेताला शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा माझ्यासाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे.”

कोरोना विषाणू संसर्गामुळे आदित्य नारायणच्या लग्नाला केवळ 50 लोक उपस्थित होते. मुंबईतील प्रसिद्ध इस्कॉन मंदिरात हा विवाह सोहळा पार पडला होता. तर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 डिसेंबरला त्यांच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. यात टीव्ही विश्वातील आणि मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते (PM Narendra Modi sent best wishes to Aditya Narayan and Shweta Agarwal).

पहिल्या चित्रपटाच्या सेटवर जुळले बंध…

एका मुलाखती दरम्यान आदित्यने आपल्या प्रेमाची कबुली देत, लवकरच लग्न करणार असल्याचे म्हटले होते. बोलताना आदित्य म्हणाला, ‘शापितच्या सेटवर माझी आणि श्वेताची भेट झाली होती. पहिल्याच भेटीत आमची छान मैत्री झाली होती. मात्र, काही काळाने मी तिच्यावर प्रेम करू लागलो, याची जाणीव मला झाली. मी तिला याबद्दल कल्पनादेखील दिली होती. मात्र, त्यावेळी आम्ही दोघेही करिअरमध्ये सेटल होण्याचा प्रयत्न करत असल्याने, प्रेमाऐवजी मैत्रीच्या नात्याला अधिक प्राधान्य दिले.

एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ दिला

‘प्रत्येक नात्यात काहीना काही अडचणी असतात. याचा अर्थ असा नाही की, ते नाते नाते संपवले पाहिजे. आजकाल अशी लग्न फार कमी कालावधीत तुटतात. त्यामुळे आम्ही एकमेकांना जाणून घेण्यासाठी पुरेसा वेळ घेतला. 10 वर्ष एकमेकांसोबत घालवल्यावर, आता या नात्याला पुढे नेण्याचे आम्ही ठरवले आहे,’ असे म्हणत आदित्यने त्याच्या नातेसंबधातील भावनिक बंध उलगडला.

काही महिन्यांपूर्वी आमच्यात भांडण झाल्याने, आम्ही वेगळे झालो, अशा अफवा पसरल्या होत्या. तेव्हा श्वेतासोबत बाहेर जाणेदेखील मुश्कील झाले होते, असे आदित्य म्हणाला. काही महिन्यांपूर्वी आदित्यचे नाव नेहा कक्करशी देखील जोडले गेले होते. मात्र, त्यांचे नाते केवळ शोमधील गमतीचा भाग होते. परंतु, या दोघांमध्ये छान मैत्रीचे नाते आहे.

(PM Narendra Modi sent best wishes to Aditya Narayan and Shweta Agarwal)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.